महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य ,रोजगार, उदयोजकता आणि नाविन्यता विभागाच्या अंतर्गत असलेल्या ठाणे जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत उद्या, ४ मार्च शनिवारी पंडित दिनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सुमारे ५ हजार पदांसाठी मुलाखती होणार असून इच्छुक तरुणांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केंद्राच्या सहायक आयुक्त संध्या साळुंखे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

हेही वाचा- उल्हासनगर महापालिकेकडून जलपर्णी हटाव मोहीम, मात्र जलपर्णी वाहून येणे सुरूच; सामूहिक प्रयत्नांची गरज

ठाण्यातील जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत हा रोजगार मेळावा होणार आहे. या मेळाव्यास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत मागील काही महिन्यांपासून विविध ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यातून अनेक तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. याचप्रमाणे ४ मार्च रोजी दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात ठाणे येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. तसेच या मेळाव्यामध्ये उद्योजकता मार्गदर्शन आणि करीयर समुपदेशन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा- ठाणे : वाहतूकीस अडथळा ठरणाऱ्या भंगार वाहने हटविण्याची कारवाई सुरुच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाण्यातील जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत हा रोजगार मेळावा होणार आहे. या देशभरातील अनेक नामांकित कंपन्यांचा सहभाग असून यामध्ये एकूण ४ हजार ९५२ पदांसाठी मुलाखती होणार आहे. तसेच मेळाव्यामध्ये स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरिता स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय उपलबध करून देणारे विविध शासकिय महामंडळे सहभागी होणार आहेत. यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाउ साठे विकास महामंडळ इत्यादी मंडळांचा समावेश असणार आहे. याचबरोबर विविध शासकिय व खाजगी क्षेत्रातील बँकांचा ही यात समावेश असणार आहे. यामुळे या मेळाव्याच्या जिल्ह्यातील तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनानामार्फत करण्यात आले आहे.