कल्याण – कल्याण रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर मंगळवारी रात्री तीन प्रवाशांना मारहाण करून चार भामट्यांनी लुटले आहे. या मारहाणीतील तीनजणांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. दीपक मगर, कुणाल गोंधळे आणि एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौथा आरोपी फरार आहे.

पोलिसांनी सांगितले, सुखविर सिंग हा प्रवासी सकाळच्या वेळेत पुण्याला जाणाऱ्या एक्सप्रेसची वाट पाहत कल्याण रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर मंगळवारी रात्री बसला होता. बसला असताना त्याला डुलकी लागली. त्याच्याजवळ पिशवी होती. त्यावेळी चारजण त्याच्याजवळ आले. त्यांनी लाथा मारून सुखविरला उठविले. त्याला मारहाण करत त्याच्या जवळील घड्याळ, मोबाईल हिसकावून तेथून पळून गेले. अचानक घडलेल्या या प्रकाराने सुखविर घाबरून गेला. त्याने लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल होताच पादचारी पुलावरील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यावेळी चारजण सुखविरला मारहाण करून लुटत असल्याचे दिसले.

हेही वाचा – ठाण्यात ‘एच ३ एन २’ आजाराचा पहिला मृत्यू

हेही वाचा – उल्हासनगरच्या प्रशासकांकडून अवास्तवी अर्थसंकल्प; करवसुलीत अपयश असूनही अर्थसंकल्प ८४३ कोटींवर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा जवान या प्रकरणाचा तपास करत आहेत. या तपासातून या चारजणांनी इतर दोन प्रवाशांना अशाच प्रकारे लुटल्याचे समोर आले आहे. त्यांच्या जवळील मोबाईल, घड्याळ हिसकावून त्यांनी पळ काढल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. लुटलेल्या वस्तू कमी किमतीला विकून त्यामधून चरस, गांजाची खरेदी हे भुरटे करत असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. या भुरट्यांनी रेल्वे स्थानक भागात आणखी काही प्रवाशांना लुटले आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.