ठाणे : फिट इंडिया मोहीमेअंतर्गत ठाणे पोलिसांच्या वतीने रविवारी (२४ ऑगस्ट) सायकलथाॅन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल रॅलीत ठाणेकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
फिट इंडिया मोहीमे अंतर्गत रविवारी सकाळी ६ वाजता ही रॅली साकेत रोड येथील साकेत मैदानातून सुरु होणार आहे. या रॅलीचा मुख्य हेतू पोलीस दल आणि नागरिकांनी आरोग्य सदृढ ठेवणे आहे, असे पोलिसांनी सांगितले.
१० किमी रॅलीचा मार्ग
– साकेत मैदान, क्रिकनाका, कोर्टनाका, चिंतामणी चौक, आग्रपाली हाॅटेल, दगडी शाळा, राम मारूती रोड, गजानन चौक, तीन पेट्रोल पंप, हरी निवास चौक, एलबीएस रोड, तीन हात नाका पूलाखालून, नितीन कंपनी, कॅडबरी जंक्शन, माजिवडा पूलावरून, साकेत पूलाखालून साकेत, महालक्ष्मी मंदिर, साकेत गृहसंकुल, साकेत मैदान.
२५ किमी रॅलीचा मार्ग
– साकेत मैदान, क्रिकनाका, कोर्टनाका, चिंतामणी चौक, आग्रपाली हाॅटेल, दगडी शाळा, राम मारूती रोड, गजानन चौक, तीन पेट्रोल पंप, हरी निवास चौक, एलबीएस रोड, तीन हात नाका पूलाखालून, नितीन कंपनी, कॅडबरी जंक्शन, रेमंड शाळा, वर्तकनगर जंक्शन, शास्त्रीनगर, शिवाई नगर, उपवन तलाव, गावंडबाग, बिरसा मुंडा चौक, काशिनाथ घाणेकर चौक, खेवरा चौक, वेरेटन निळकंठ बंगले चौक, मुल्ला बाग, ब्रम्हांड, पातलीपाडा उड्डाणपूलाखालून वळण घेऊन, ब्रम्हांड, मानपाडा, कापूरबावडी, माजिवडा, साकेत, महालक्ष्मी मंदिर, साकेत गृहसंकुल, साकेत मैदान.