ठाणे – ठाणे महापालिकेतील शिंदे गटाच्या माजी नगरसेवकच्या मुलासाह १५ जणांवर मारहाणी प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पूर्व वैमन्यस्यातून हा हल्ला झाला असून सिसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरु असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. सोहेल खान असे जखमी तरुणाचे नाव आहे.
नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारीनुसार, तो शुक्रवारी सायंकाळी त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी गेला ठाण्यात आला होता. त्याच वेळी १५ जणांनी त्याच्यावर लोखंडी रॉड, लाकडी फळीने बेदम मारहाण करत हल्ला केला. या घटनेत सोहेल हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या घटनेत त्याच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याला ४५ टाके पडल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे. त्याच्या नातेवाईकांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. सिसीटीव्ही चित्रीकरण मिळाले असून त्या आधारे तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयित आरोपीमध्ये शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या मुलाचा समावेश आहे.