ठाण्यातील महावितरणच्या गडकरी उपविभागाच्या कार्यक्षेत्रातील तारांगण व पोखरण नंबर-२ वीज वाहिन्यांवर देखभाल दुरुस्तीचे काम मंगळवारी हाती घेण्यात येणार आहे. तर लोकमान्यनगर विभागाच्या कार्य क्षेत्रातील पोखरण-१ या वीज वाहिनीवरही काम केले जाणार आहे. त्यामुळे या वाहिन्यांवरून वीजपुरवठा होणाऱ्या भागामध्ये सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळात वीजपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तारांगण चेम्बर्स, विम्बल्डन पार्क, सिद्धेश्वर तलाव, चंदनवाडी, नितीन कंपनी, प्रेस्टिज गार्डन, पाचपाखाडी, अल्मेडा रोड, नूरीदर्गा रोड, भक्ती मंदिर, वंदना सोसायटी, टेकडी बंगला, पूर्वा सोसायटी, वंदना बस डेपो, उदयनगर, लुईसवाडी, रामचंद्र नगर १, २ व ३, कोरम मॉल, देवकॉरपोरा, सत्कार हॉटेल, टीसीएस कंपनी, व्होल्टास कंपनी, ज्युपिटर हॉस्पिटल, एक्सएलओ, जे.के.केमिकल्स, सिंघानिया स्कूल, रेमंड शॉप, टीएमटी पंपिंग, कौशल्य हॉस्पिटल, लोकमान्यनगर, पोलीस कॉलनी, सावरकरनगर, बस डेपो एरिया, करवालेनगर, रोड नं. २२, रोड नं. ३३, पाचपाखाडी, सावकरनगर या भागातील वीजपुरवठा खंडित असेल.
संग्रहित लेख, दिनांक 24th May 2016 रोजी प्रकाशित
ठाण्यातील अनेक भागांत आज वीजपुरवठा बंद
लोकमान्यनगर विभागाच्या कार्य क्षेत्रातील पोखरण-१ या वीज वाहिनीवरही काम केले जाणार आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 24-05-2016 at 06:23 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power closed today in many parts of the thane