बदलापूर:  बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी राज्य सरकार म्हणते की आम्हाला ७० टक्के प्रकल्पग्रस्तांचा पाठिंबा आहे. जर असं असेल तर मग आंदोलकांवर लाठी हल्ला करण्याची गरज का पडली, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. बदलापुरात आयोजित महाधम्म मेळावाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही टीका केली.

महाराष्ट्र सर्वात पुरोगामी राज्य आहे, मात्र हे फक्त म्हणून चालणार नाही. त्यासाठी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांसारखी दृष्टी असायला हवी, असे सांगत त्यांनी राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारवर टीका केली. कोकणातील बारसू रिफायनरीच्या मुद्दय़ावरही आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. केंद्रातून फोन आला की आताच्या आणि यापूर्वीच्या सरकारही निर्णय बदलतात असा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस हा सरडय़ासारखा रंग बदलणारा पक्ष असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जे फुले – शाहू – आंबेडकर यांचे नाव घेत होते ते आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि भाजपच्या वाटेवर दिसत आहेत असे सांगत त्यांनी अजित पवारांवरही टीका केली.