जागतिक ग्रंथदिनी प्रकाशन; रद्दी पुस्तक विक्रेत्यांचा राज्यव्यापी मेळावा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जीवनावश्यक आणि चैनीच्या वस्तू मिळणाऱ्या दुकानांच्या तुलनेत महाराष्ट्रात साहित्यविषयक पुस्तकांची विक्री करणाऱ्या दालनांची संख्या अगदीच नगण्य आहे. अनेक मोठय़ा शहरांमध्ये तर वाङ्मयीन पुस्तके मिळण्याची सोयच नाही. मोठमोठय़ा मॉलमध्ये बाकी सर्व काही मिळते, पण मराठी पुस्तक मिळत नाही. अशा परिस्थितीत ग्रंथप्रेमी मंडळींना हवी असलेली, परंतु अत्यंत दुर्मीळ असणारी पुस्तके मिळवून देण्याचे कार्य ठिकठिकाणचे रद्दीवाले करीत असतात. मराठी वाचन संस्कृती टिकविणाऱ्या तसेच अनेक दुर्मीळ ग्रंथ गरजूंपर्यंत पोहोचविणाऱ्या अशा रद्दीवाल्यांची समग्र सूची तयार करण्याचे काम बदलापूर येथील स्वायत्त मराठी विद्यापीठाने मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने हाती घेतले आहे. या सूचीत महाराष्ट्रात विविध ठिकाणी दुर्मीळ पुस्तकांची विक्री करणाऱ्या ग्रंथ विक्रेत्यांची माहिती संकलित केली जाणार आहे. येत्या जागतिक ग्रंथदिनी २३ एप्रिल रोजी ही सूची प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानिमित्त महाराष्ट्रभरातील जुन्या पुस्तकांची विक्री करणाऱ्यांचा मेळावा बदलापूरमध्ये भरविण्यात येणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Road book seller
First published on: 25-02-2017 at 02:18 IST