डोंबिवली– येथील पश्चिमेतील कोपर भागातील सखारामनगर काॅम्पलेक्स भागातील काँक्रीट रस्त्याने बाधित रोहित्र, वीज वाहिन्या भूमिगत टाकण्याचे काम शनिवार (ता.१९) पासून सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी सखाराम काॅम्पलेक्स जवळील रघुनाथ म्हात्रे इमारत ते साई प्लाझा इमारतीपर्यंतचा रस्ता वीज वाहिन्यांचे काम पूर्ण होईपर्यंत पूर्ण बंद ठेवण्यात येणार आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन, डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी केले आहे.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये भाजपचा मूक मोर्चा, मुलीच्या हत्येप्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाईची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रघुनाथ म्हात्रे इमारत ते साई प्लाझा इमारतीपर्यंतच्या १५० मीटर रस्त्यावरील रोहित्र, उच्च, लघु दाब वीज वाहिन्यांचे काँक्रीटीकरणामुळे स्थलांतर, काही कामे भूमिगत करायची आहेत. या कामासाठी तात्पुरता रस्ते वाहतूक बदल करण्याची मागणी पालिकेचे विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी वाहतूक विभागाकडे केली होती. हा रस्ता सखाराम काॅम्पलेक्स रिक्षा वाहनतळाजवळ बंद राहणार असल्याने चालकांनी कोपर भागातील स्वामी समर्थ रस्ता मार्गे वळण घेऊन इच्छित स्थळी जावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. काम पूर्ण होईपर्यंत हा रस्ता बंद राहणार आहे.