नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलाश जाधव यांच्या ठाण्यातील निवासस्थानातून १ लाख ६२ हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कैलाश जाधव यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलाश जाधव यांचे ठाण्यातील वसंत विहार येथे बंगला आहे. या बंगल्यात त्यांच्या पत्नी आणि मुलगा राहतात. शुक्रवारी सांयकाळी दोघेही जण नाशिक येथे कैलाश जाधव यांना भेटण्यासाठी गेले होते. घरात कोणीही नसताना चोरट्यांनी बंगल्यातील १ लाख ६२ हजार रुपयांची रोकड चोरी केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbery at nashik commissioner kailas jadhavs thane home scsg
First published on: 14-03-2022 at 08:26 IST