डोंबिवली पश्चिमेतील राजूनगर भागातील वृंदावन सोसायटी जवळील एका रिक्षा चालकाच्या घरावर मंगळवारी पहाटे दोन वाजता सशस्त्र तीन जणांनी दरोडा टाकला. लक्ष्मीपूजनाचा दिवस असल्याने घरात मोठे घबाड मिळेल अशी अपेक्षा दरोडेखोरांना होती. घरात घुसल्यानंतर त्यांनी तलवार, लोखंडी सळईने कुटुंबीयांना मारहाण केली. कुटुंबीयांनी आक्रमक पवित्रा घेऊन प्रतिकार केल्याने घरातील ४१ हजार रुपयांचा ऐवज घेऊन दरोडेखोर पळून गेले.

हेही वाचा >>>VIDEO : दुचाकीवरून आले आणि थेट फटाक्यांच्यामाळेवर कोसळले ; अंबरनाथमध्ये स्टंटबाज दुचाकीस्वारांची फजिती

दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात रिक्षा चालक शैलेश कीर, त्यांचा मुलगा संचित गंभीर जखमी झाले. डोंबिवली पश्चिमेत रेल्वे स्थानका जवळील रिक्षा वाहनतळावर क्रमांकावरुन रांगेत रिक्षा लावण्यावरुन सहा महिन्यापूर्वी रिक्षा चालक शैलेश आणि काटे चाळीतील मुरबाड तालुक्यातील रहिवासी असलेल्या रिक्षा चालकांबरोबर सहा महिन्यापूर्वी भांडण झाले होते. तो राग मुरबाडकडील रिक्षा चालकांच्या मनात होता, असा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. कट रचून आपल्या घरावर दरोडा टाकला, असे तक्रारदार संचित कीर यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे.
राजूनगर मध्ये राज पार्क संकुला समोर वृंदावन सोसायटी जवळ रिक्षा चालक शैलश कीर, पत्नी, मुलगा, वृध्द आई समवेत राहतात. हे कुटुंब झोपेत असताना मंगळवारी पहाटे दोन वाजता घराची मागील बाजूची खिडकी तोडून दरोडेखोरांनी घरात प्रवेश मिळविला. वृध्द आईला घरात आवाज येत असल्याचे जाणवले. ती चोर म्हणून ओरडू लागली. मुलगा संचित जागा झाला. त्याला तलवार, लोखंडी सळई घेऊन तीन जण घरात घुसल्याचे दिसले.

हेही वाचा >>>कल्याण : सलग तीन दिवस लोकल उशिरा धावत असल्याने प्रवासी संतप्त ; अंबरनाथच्या दरम्यान सोमवारी सकाळी तांत्रिक अडचण

त्याने वडील शैलेश यांना आवाज दिला. एका दरोडेखोराने संचितवर तलवारीने वार करुन त्याला जखमी केले. दुसऱ्या खोलीतून शैलेश बाहेर येऊ नये म्हणून दरोडेखोर महिलेने शैलेश झोपलेल्या खोलीचा दरवाजा उघडू नये म्हणून बाहेरुन ओढून धरला. जोरदार हिसका देऊन त्यांनी दरवाजा उघडताच महिलेने त्यांच्यावर लाकडी दांडक्याने प्रहार केले. तेच दांडके घेऊन शैलेश यांनी महिलेला प्रसाद दिला. लोखंडी सळई घेऊन दरोडेखोरांनी शैलेश यांच्यावर हल्ला चढविला. वडील, मुलगा दोघेही चार पुरुष, एक महिला दरोडेखोरांशी प्रतिकार करत असताना शैलेश यांची पत्नी चोर चोर ओरडा करत त्यांच्या खोलीतून बाहेर आली. आता आपण पकडले जाऊ असे लक्षात आल्यावर दोन चोरटे घरातील महागडे घड्याळ, दुचाकीची चावी, मुलाच्या गळ्यातील दोन तोळ्याची ४० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून पळून गेले.संचितने पकडून ठेवलेल्या दरोडेखोराने जोराचा हिसका देऊन तो तलवारीसह पळून गेला. संचित, शैलेश यांनी दरोडेखोर महिलेला घेरताच दोन पुरुष दरोडेखोर पळून गेले. महिलेने आक्रमक पवित्रा घेत पळ काढला. शैलेश, संचितने त्यांचा पाठलाग केला, पण अंधाराचा फायदा घेत ते पळून गेले. दरोडेखोरांनी चेहऱ्या भोवती बुरखे पांघरले होते, असे शैलेश कीर यांनी सांगितले. दरोडेखोर २४ वयोगटातील होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

” दरोडेखोरांचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासले जात आहे. तक्रारदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे.”- पंढरीनाथ भालेराव ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,विष्णुनगर पोलीस ठाणे</strong>