ठाणे – रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टच्या वतीने वड, पिंपळ यांसारख्या विविध झाडांच्या बिया वापरून मातीचे गोळे करण्यात आले. यामध्ये दोन हजार ३०० विद्यार्थी, ३०० सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, १०० रोटेरियन यांनी मिळून दोन लाख पाच हजार ८० सीडबॉलची निर्मिती केली.
ओमकार शाळेसह शहरातील विविध शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी मिळून हे बॉल तयार केले. संत सावळाराम क्रीडा संकुलातील बंदिस्त क्रीडांगणमध्ये हा उपक्रम संपन्न झाला. निर्मिती केलेले लाखो सीडबॉल हे शहरातील विविध रिकाम्या जागेत, घाटात तसेच टेकड्यांवर पेरण्यात येतील. यावेळी कार्यक्रमावेळी भाजपचे प्रदेश कार्यद्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार राजेश मोरे, महापालिका आयुक्त अभिनव गोयल, रोटरीचे जिल्हाध्यक्ष दिनेश मेहता, अध्यक्ष माधव सिंग, सचिव चक्रपाणी शुक्ल, फर्स्ट लेडी उमा सिंग, प्रकल्प प्रमुख डॉ. महेश पाटील हे उपस्थित होते.