Mira Road Murder Case Mumbai : सरस्वती वैद्य आणि मनोज साने यांनी मंदिरात लग्न केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र मनोज साने याचे वय जास्त असल्याने ही बाब बाहेर लपवून ठेवली होती. ती ज्या अनाथ आश्रमात वाढली तिथे सर्वांना मनोज मामा असल्याचे सांगत होती. सारस्वती वैद्यला एकूण ४ बहिणी आहेत. सर्व बहिणी अनाथ आश्रममध्ये राहात होत्या. पाच बहिणींमध्ये सरस्वती सर्वात लहान होती. त्यांची आई लहानपणी वारली होती आणि वडील वेगळे झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनाथ आश्रममधून सरस्वती मुंबईला आपल्या नातलगकडे आली होती. त्यानंतर जॉबच्या शोधत असताना मनोज साने याच्याशी ओळख झाली. सरस्वतीला आधार देण्याचे आश्वासन देऊन त्याने तिचा विश्वास संपादन केला. एकत्र रहायचे होते म्हणून दोघांनी मंदिरात लग्न केले होते. त्यांनंतर ते बोरिवली येथील फ्लॅटमध्ये राहू लागले. दोघांमध्ये वयाचे अंतर होते. त्यामुळे अनाथ आश्रमात जाताना ती सर्वांना साने मामा असल्याची थाप मारत होती. सानेसोबत लग्न केल्याचे तिने बहिणींना सांगितले होते.

हेही वाचा – डोंबिवलीत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अत्याधुनिक तंत्रज्ञानातून रस्ता बांधणी

बहिणींची डीएनए चाचणी

सरस्वतीच्या बहिणींची डीएनए चाचणी करण्यात येत आहे. त्यांनी मृतदेहाची मागणी केली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली. सरस्वतीने आत्महत्या केली, असा दावा आरोपी साने याने केला आहे. त्याचा तपास सुरू आहे. शुक्रवारी दिवसभर पोलिसांनी साने याची कसून चौकशी केली. त्याने दिलेली सर्व माहिती तपासली जात आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saraswati and manoj sane got married in the temple dna test of saraswati 3 sisters ssb
First published on: 09-06-2023 at 16:29 IST