scorecardresearch

Premium

उल्हासनगर : कलानींना आपल्याकडं वळविण्यासाठी शरद पवार गटाचं प्रयत्न, निवासस्थानी नेत्यांच्या भेटी

उल्हासनगर महापालिकेसह विधानसभा आणि लोकसभेमध्ये मतांची बेगमी करायची असल्यास कलानी कुटुंबाला जवळ ठेवावे लागते.

sharad pawar faction of ncp started visiting pappu kalanis residence ahead of election
शरद पवार गटाच्या नेत्यांनी कलानी यांच्या निवासस्थानी भेटी सुरू केल्या आहेत

उल्हासनगरात सत्तेच्या केंद्रस्थानी राहणारे कलानी कुटुंबीय गेल्या काही महिन्यांपासून आपल्या राजकीय भूमिकेपासून अंतर राखून होते. परंतु उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या अजित पवारांच्या शपथविधीला कलानी गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्यांनी कलानी यांच्या निवासस्थानी भेटी सुरू केल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या तोंडावर कलानींची मते आपल्या पारड्यात पाडण्यासाठी शरद पवार गटाचे नेते प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा >>> “कल्याण लोकसभेची वाटचाल भाजपा उमेदवाराच्या दिशेने”, मनसे आमदार राजू पाटलांचं सूचक वक्तव्य

mumbai District office bearers and district presidents meeting
विरोधकांकडे असलेले मतदारसंघ जिंकण्यासाठी प्रयत्नांची शर्थ; तावडे
Sharad Pawar pimpri chinchwad
पक्षातील फुटीनंतर शरद पवार पहिल्यांदाच अजितदादांच्या बालेकिल्यात; कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत
Former corporator son suicide nagpur
नागपूर : माजी नगरसेवकाच्या मुलाची आत्महत्या, पोलीस ठाण्याला नागरिकांचा घेराव
buldhana
मराठा आरक्षण: मोताळ्यातील उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; दोघांना रुग्णालयात हलविले, आंदोलन चिघळले

उल्हासनगर महापालिकेसह विधानसभा आणि लोकसभेमध्ये मतांची बेगमी करायची असल्यास कलानी कुटुंबाला जवळ ठेवावे लागते. त्यानुसार २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने अनेक आरोप-प्रत्यारोपांनंतरही माजी आमदार पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी यांना जवळ केले. त्यानंतर भाजपला पालिका निवडणुकांमध्ये सत्ता प्राप्त करता आली. पहिल्यांदाच भाजपने शिवसेनेला दूर ठेवून सत्ता मिळवली होती. मध्यंतरीच्या काळात आघाडीपूर्व आश्वासनांवरून बेबनाव झाल्याने कलानी गटाने भाजपला पराभवाची धूळ चारत शिवसेनेला मदत केली. त्यामुळे संख्याबळ असूनही भाजपचा महापौरपदाचा उमेदवार पराभूत झाला होता. त्यानंतर भाजप आणि कलानी कुटुंबांमध्ये मोठे अंतर निर्माण झाले. याच काळात माजी आमदार पप्पू कलानी उल्हासनगर शहरात सक्रीय झाले.

हेही वाचा >>> “भारत, इंडिया, हिंदुस्तान, काय जातंय ३ नावं घ्यायला?” राज ठाकरे यांची फटकेबाजी

मध्यंतरीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलानी आणि गंगोत्री गटामध्ये वाकयुद्ध रंगले. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांनी कलानी गटाची साथ दिली होती. त्यामुळे कलानी गटाचे महत्व अधोरेखीत झाले होते. त्यानंतर ज्यावेळी अजित पवार यांनी महायुतीला साथ देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यावेळी कलानी गटातील काही पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर शरद पवार यांच्या सभेतही कलानी गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे कलानींची नेमकी भूमिका काय याबाबत प्रश्नचिन्ह होते. पवार गटाच्या नेत्यांनी कलानी महल गाठून त्यांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न सुरू केले. नुकतेच आमदार रोहित पवार यांनीही कलानी महलावर जात पप्पू कलानी यांची भेट घेतली. त्यामुळे महापालिकेच्या तोंडावर कलानी कुटुंबाला आपल्याकडे वळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील पवार गटाचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.

कलानींचा वरचष्मा उल्हासनगर विधानसभा मतदारसंघासह आसपासच्या भागात कलानींचे वर्चस्व आहे. त्यांच्या गटाचे सर्वाधिक नगरसेवक या भागात आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी खुद्द तत्कालीन नगरविकास मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीम ओमी कलानी गटाने आयोजित केलेल्या सभेत मंचावर हजेरी लावली होती. त्यामुळे कलानींचे महत्व अधोरेखीत झाले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sharad pawar faction of ncp started visiting pappu kalanis residence ahead of election zws

First published on: 25-09-2023 at 16:48 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×