मध्यवर्ती ठाण्यातून चिमण्या हद्दपार होण्याच्या मार्गावर

ठाणे शहरातील चिमण्यांचे अस्तित्व वाढवण्यासाठी एकीकडे महापालिकेतर्फे कृत्रिम घरटय़ांची उभारणी करण्याचा उपक्रम राबवला जात असताना, नौपाडा व जांभळी नाका या मध्यवर्ती ठाण्यातील अधिवास चिमण्यांना नकोसा वाटू लागल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ‘होप’ या पर्यावरण संस्थेच्या पाहणीत ठाणे शहरात ३१३१ चिमण्यांची नोंद आढळली असून नौपाडा व जांभळी नाका परिसरात चिमण्यांची संख्या कमालीची रोडावल्याचे दिसून आले आहेत.

thane church members marathi news
ठाणे: चर्चमधील हजारो सदस्यांचा १०० टक्के मतदान करण्याचा निर्णय
through online transactions, airline employee, defrauded, shil pahata area, thane
ठाणे : विमान कंपनीतील कर्मचाऱ्याची ३७ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
Wild dogs were found for the first time in Phansad Sanctuary
फणसाड अभयारण्यात पहिल्यांदा आढळला रानकुत्र्यांचा वावर
Sujay Vikhe Patil, terror-mongers,
दहशत माजविणाऱ्यांना चोख उत्तर द्या – डॉ. सुजय विखे पाटील

वाढते बांधकाम, प्रदूषणामुळे शहरातील चिमण्यांची संख्या गेल्या काही वर्षांपासून सातत्याने कमी होत असल्याने निरीक्षण यापुर्वीच अनेक पर्यावरणप्रेमी, संस्थांनी नोंदवले आहे. पर्यावरणविषयक संस्था, प्राणीविषयक संस्था वेगवेगळ्या पातळीवर चिमण्याचा अधिवास कायम राहण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ‘होप’ या संस्थेतर्फे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने ठाणे शहरात नुकतीच चिमणी गणना करण्यात आली.

कोपरी येथील खाडी किनारा, जोशी बेडेकर महाविद्यालयातील  परिसर, साकेत या परिसरात चिमण्यांची संख्या अधिक आढळून आल्याचे संस्थेचे निरीक्षण आहे. येऊर आणि ठाण्यातील काही जुन्या घरांच्या कौलांवर या चिमण्यांची संख्या कमी असली तरी त्यांची घरटी पाहावयास मिळाल्याचे संस्थेच्या स्वयंसेवकांनी सांगितले. तसेच ठाणे पूर्व भागात चिमण्यांसाठी दारापुढे किंवा कौलावर खाद्यपदार्थ, पाणी ठेवल्याचे दिसून आले.

त्यामुळे या परिसरातही चिमण्यांची संख्या अधिक असल्याचे संस्थेच्या निदर्शनास आले. ठाण्यातील व्यावसायीक पट्टा अशी ओळख असलेला गोखले मार्ग ते मामलेदार मिसळ असलेल्या जांभळी नाका पर्यंतच्या परिसरात संस्थेच्या सदस्यांना अनेक दिवसांत एकही चिमणी दिसून आली नाही, असे धक्कादायक निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

बांदोडकर महाविद्यालयाच्या माधुरी पेजावर, होप फाऊंडेशनचे श्याम घाटे, शशीकुमार मेनन, पर्यावरण दक्षता मंडळाचे रवींद्र साठे यांनी तांत्रिक पद्धत वापरून ही गणना केली असल्याचे होप संस्थेतर्फे सांगण्यात आले. या वेळी ठाण्यातील ४८ नागरिकांनी यामध्ये सहभाग दर्शविला असल्याचे संस्थेचे सदस्य शशीकुमार मेनन यांनी सांगितले.

सकाळी जास्त, सायंकाळी तुरळक

दिल्ली आणि उत्तर प्रदेश येथे वापरण्यात आलेल्या चिमणी गणनेच्या वैज्ञानिक तंत्राचा वापर चिमणी गणनेसाठी करण्यात आला. या वेळी ठाण्यातील२३ महत्त्वाचे रस्ते संस्थेतर्फे निश्चित करण्यात आले. यापैकी प्रत्येक रस्त्यावर शंभर मीटरच्या अंतरावर थांबून चिमण्यांची नोंद करण्यात आली आहे. २० ठिकाणी ही गणना सकाळी ७ ते ९ आणि सायंकाळी ४ ते ६ या वेळेत  करण्यात आली आहे. सायंकाळी केलेल्या चिमण्या कमी आढळून आल्या. याउलट सकाळी चिमण्यांची संख्या अधिक होती.

नर-मादी गुणोत्तरही असमान

या गणनेत नर चिमण्यांची संख्या १०४४, मादी चिमण्यांची संख्या १२२९ एवढी नोंद करण्यात आली आहे. तसेच कोणतेही लिंग समजले नाही, अशा चिमण्यांची संख्या ८५८ एवढी होती. एका मादी चिमणीमागे एक नर चिमणी असे गुणोत्तर असणे गरजेचे आहे. मात्र ठाण्यात हे गुणोत्तर तीन मादींमागे दोन नर चिमण्या असे असल्याचे या संस्थेतर्फे सांगण्यात आले.