डोंबिवली : डोंबिवली पूर्व राजाजी रस्ता भागात एका सोसायटीत कुटुंबीयांसह राहत असलेल्या दहावीच्या विद्यार्थिनीने सोमवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. या तरुणीने आत्महत्या कोणत्या कारणासाठी केली याचा उलगडा झालेला नाही, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

हेही वाचा : साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले? काय चुकले?

मुलगी दहावी होऊन महाविद्यालयात जाईल अशी स्वप्ने पाहणाऱ्या आई-वडिलांना या घटनेने धक्का बसला आहे. रामनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची कुटुंबीयांनी तक्रार केली आहे. खुशी गोविंद मौर्या (१७) असे मरण पावलेल्या तरुणीचे नाव आहे. ती राजाजी रस्ता भागातील सदगुरु सेवा सदन सोसायटीत आपल्या कुटुंबीयांसह राहत होती.सोमवारी दुपारी खुशीची आई तिच्या लहान मुलाल मढवी शाळेतून आणण्यासाठी गेली. त्यावेळी खुशीने तिला बाजारातून येताना पेरू घेऊन ये असे सांगितले.

हेही वाचा : दिवाळी भेटवस्तूंना ‘या’ पालिकेत No Entry ; कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट स्वीकारण्यास मनाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खुशीने सांगितल्याप्रमाणे आई बाजारातून पेरू घेऊन आली. घरी आल्यानंतर तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. दरवाजा आतून बंद होता. खुशी दरवाजा उघडत नाही म्हणून शेजारी आले. इमारत देखभालीची काम करणारा एक कामगार इमारतीवरुन झोळ्यावरुन खाली उतरला. आणि त्याने झोळ्यावरुन खुशी यांच्या घरात पाहिले त्यावेळी तिने पंचा गळ्याला आवळून छताला गळफास घेतला होता. तातडीने ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. खुशी ही अभ्यासू, कष्टाळू विद्यार्थिनी होती. तिने असे का केले ते समजत नाही, असे स्थानिक माजी नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी सांगितले.