scorecardresearch

सुषमा अंधारे वादग्रस्त वक्तव्य प्रकरण: कल्याण-डोंबिवलीमध्ये बंद कडे पाठ फिरवून नियमित व्यवहार सुरू

डोंबिवलीतील लालबावटा रिक्षा संघटनेने आम्ही या बंदमध्ये सामील होणार नाही असे जाहीर केले आहे.

सुषमा अंधारे वादग्रस्त वक्तव्य प्रकरण: कल्याण-डोंबिवलीमध्ये बंद कडे पाठ फिरवून नियमित व्यवहार सुरू
सुषमा अंधारे वादग्रस्त वक्तव्य प्रकरण: डोंबिवली-कल्याणमध्ये बंद कडे पाठ फिरवून नियमित व्यवहार सुरू

डोंबिवली: शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शनिवारी हिंदुत्ववादी संघटना, बजरंग दल, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने डोंबिवली-कल्याण बंदचे आवाहन केले आहे. आज सकाळपासूनच डोंबिवली कल्याण शहरातील व्यवहार नियमितपणे सुरू झाले आहेत. रिक्षा बस वाहतूक सुरळीत सुरू आहे. बाजारपेठा नेहमीप्रमाणे उघडण्यात आल्या आहेत.

डोंबिवलीतील लालबावटा रिक्षा संघटनेने आम्ही या बंदमध्ये सामील होणार नाही असे जाहीर केले आहे. तर ज्यांना या बंदमध्ये सामील व्हायचे आहे त्यांनीच सामील व्हावे. कोणावर सक्ती केली जाणार नाही असे बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे जाहीर करण्यात आले. त्यामुळे हा बंद किती यशस्वी होतो अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-12-2022 at 09:29 IST

संबंधित बातम्या