डोंबिवली – डोंबिवली पूर्व भागातील २७ गावांमधील दावडी गावात नारायणा महाविद्यालयाच्या बाहेर एका अल्पवयीन विद्यार्थ्याला पूर्ववैमानस्यातून दहाजणांच्या टोळक्याने शनिवारी बेदम मारहाण केली.

अल्पवयीन विद्यार्थी नारायण महाविद्यालयमध्ये शिक्षण घेत आहे. त्याचे यापूर्वी याच महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याबरोबर मोबाईलवरून भांडण झाले होते. त्या रागातून आरोपी आणि त्याच्या नऊ साथीदारांनी शनिवारी संध्याकाळी महाविद्यालय सुटल्यानंतर तक्रारदार विद्यार्थ्याला नारायणा महाविद्यालयाच्या बाहेर गाठले. तेथे त्याला आरोपी निखिल यादव, किसन आणि इतर आठजणांनी जमिनीवर पाडून बेदम मारहाण केली.

हेही वाचा – ठाणे: राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर ठाण्यात राजकीय घडामोडींना वेग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तक्रारदार अल्पवयीन विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली आहे. मारहाण केल्यानंतर आरोपी तरुण पळून गेले. अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात नऊजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.