डोंबिवली – ठाणे जिल्ह्यातून अठरा महिन्यांसाठी हद्दपार केलेल्या एका तडीपार गुंडाने सोमवारी रात्री डोंबिवली पूर्वेतील इंदिरानगर भागात हातात कोयता घेऊन दहशत माजविली. पादचाऱ्यांना कोयत्याचा धाक दाखवून घाबरून सोडले. ही माहिती कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच पोलिसांनी थरार नाट्याप्रमाणे या गुंडाचा पाठलाग करून त्याला अटक केली.

गणेश उर्फ गटल्या बाळू आहिरे (२२) असे तडीपार गुंडाचे नाव आहे. तो इंदिरानगर भागात राहतो. एक तडीपार गुंड डोंबिवलीत येऊन इंदिरानगर भागात हातात कोयता घेऊन दहशत माजवित आहे, अशी माहिती कल्याण गुन्हे शाखेचे हवालदार दत्ताराम भोसले यांना मिळाली. त्यांनी ही माहिती तातडीने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांना दिली. पवार यांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, हवालदार दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, गुरूनाथ जरग, विश्वास माने, दीपक महाजन यांचे पथक घटनास्थळी रवाना केले. पोलिसांचे वाहन येत असल्याचे पाहून गणेश इंदिरानगर झोपडपट्टीच्या आतील भागात पळू लागला. पोलीस पथकाने पाठलाग करून इंदिरानगर मधील डाॅ. आंबेडकर पुतळ्याच्या मागे गुंड गणेशला अटक केली.

हेही वाचा – परभणीत महायुतीचे धक्कातंत्र

गणेशला अटक करताना त्याने कोयत्याच्या साहाय्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण आक्रमक असलेल्या पथकाने गणेशची गठडी वळली. गणेश हा पोलीस अभिलेखावरील खतरनाक गुंड आहे. त्याच्यावर दहशत माजविणे असे चार गुन्हे पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. त्याच्यावर दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.

हेही वाचा – सांगलीत प्रचारात रंग भरण्यापूर्वीच रुसवे-फुगवे सुरू

हेही वाचा – रायगडात महायुतीतील वाद चव्हाट्यावर, शिंदे गटाच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस पथकाने गणेशला अटक करून रामनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. इंदिरानगर भागात गणेशचा वावर वाढल्यापासून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते.