डोंबिवली- कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागात शिवसेना ‘उध्दव बाळासाहेब ठाकरे’ पक्षातर्फे ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र, राज्य सरकारने केलेल्या फसव्या योजनांविषयी या चौक सभांच्या माध्यमातून स्थानिक शिवसेना पदाधिकारी नागरिकांशी संवाद साधणार आहेत. १ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत या चौक सभा होणार आहेत. कल्याणमध्ये शिवसेनेचे शहरप्रमुख सचीन बासरे, डोंबिवलीत शहरप्रमुख विवेक खामकर यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> दिव्यातील दोन हजार रहिवाशांना दिलासा; १४ इमारती तोडण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

गेल्या नऊ वर्षाच्या काळात केंद्रातील भाजप सरकार, राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने अनेक घोषणा केल्या. तसेच नागरिकांना आश्वासने दिली आहेत. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने या योजनांच्या माध्यमातून नागरिकांची कशी फसवणूक केली जात आहे, याची माहिती नागरिकांना ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रमातून दिली जाणार आहे. नागरिकांनाही या कार्यक्रमात सहभागी करुन घेतले जाणार आहे, असे डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर यांनी सांगितले. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, दुर्बल घटक, विकासाचे प्रकल्प याविषयी केंद्रातील भाजप सरकारने वेळोवेळी अनेक आश्वासने जनतेला दिली.

हेही वाचा >>> ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचा खोळंबा! वांगणीजवळ इंजिन बंद पडल्याने कल्याण ते कर्जत दरम्यानची लोकल सेवा विस्कळीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य सरकारने त्याची री ओढत घोषणा केल्या आहेत. प्रत्यक्षात या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. काही योजना सुरू आहेत. त्याचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थीपेक्षा अन्य मंडळी घेत आहेत. केवळ मतांच्या राजकारणासाठी केंद्र, राज्य सरकारे लोकांच्या भावनेशी कशी खेळत आहेत, हे लोकांसमोर उलगडून सांगितले जाणार आहे. लोकांनाही या उपक्रमात सहभागी करुन घेतले जाणार आहे, असे कल्याणचे शहरप्रमुख सचीन बासरे यांनी सांगितले. कल्याणमध्ये अशाच प्रकारे चौक सभा आणि मार्गदर्शनाचा कार्यक्रम मराठा समाज मंदिर सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे.