कल्याण-भिवंडी मार्गावरील टेमघर भागात रिक्षा अपघातात दीड वर्षांच्या समीर गौतम याचा मृत्यू झाल्याचा प्रकार गुरूवारी उघडकीस आला आहे. समीरला ताप आल्याने त्याची आई आणि आजी त्याला रिक्षातून दवाखान्यात घेऊन जात होते. या अपघाताप्रकरणी समीर याचे वडील अश्विनकुमार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> मानखुर्द-ठाणे प्रवास लवकरच वेगवान, छेडानगरमधील उड्डाणपुलाचे काम पूर्ण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टेमघर भागात अश्विनकुमार राहत असून त्यांना दीड वर्षांचा समीर हा मुलगा होता. समीरला ताप असल्याने समीरची आई आणि आजी त्याला रिक्षामधून डॅाक्टरकडे घेऊन जात होते. दरम्यान, रिक्षा अरिहंत टाॅवर परिसरात आली असता, रिक्षा चालकाने भरधाव रिक्षा चालविली. त्यामुळे त्याचे रिक्षावरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा समोरील एका रिक्षाला घडकली. या घटनेत समीर, त्याची आई आणि आजी रिक्षातून खाली पडले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु समीरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी शुक्रवारी समीरच्या वडिलांनी रिक्षा चालकाविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.