ठाणे : कौटुंबिक वादातून तरुणाने घेतली खाडीत उडी

कळवा येथील मनिषानगर परिसरात ३५ वर्षीय तरुण राहतो. शुक्रवारी त्याचे कौटुंबिक वाद झाले होते.

ठाणे : कौटुंबिक वादातून तरुणाने घेतली खाडीत उडी
तरुणाला ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या पथकाने वाचविले

कौटुंबिक वादातून एका ३५ वर्षीय तरुणाने थेट खाडीत उडी घेतल्याचा प्रकार शुक्रवारी कळवा भागात उघडकीस आला आहे. या तरुणाला ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या पथकाने वाचविले आहे.

कळवा येथील मनिषानगर परिसरात ३५ वर्षीय तरुण राहतो. शुक्रवारी त्याचे कौटुंबिक वाद झाले होते. या वादातून त्याने घरातून बाहेर पडून कळवा खाडीत उडी मारली. या घटनेची माहिती एका व्यक्तीने पोलिसांना दिल्यानंतर कळवा पोलीस, ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तरुण बुडत असताना पथकाने त्याला वाचविले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
कल्याण : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही २५ आदिवासी पाडे रस्ते, विजेपासून वंचित
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी