ठाणे – ठाणे शहरातील तलाव प्रदुषित होऊ नयेत यासाठी ठाणे महापालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून कृत्रिम तलाव तयार करण्यात येत आहे. या पर्यावरणपूरक विसर्जन व्यवस्थेस नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. यंदाही पालिकेने अशीच व्यवस्था गणेश मूर्ती विसर्जनासाठी उभारली असून त्यात गेल्यावर्षी पेक्षा यंदा विसर्जन व्यवस्थेत दिड पट वाढ करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सहा फुटांपर्यंतच्या सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावात करण्यात येणार आहे. तर, सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित करता येणार आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात कृत्रिम तलाव आणि फिरत्या विसर्जन व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी पेक्षा दीड पट जास्तीची विसर्जन व्यवस्था केली आहे. यंदा २३ कृत्रिम तलाव, ७७ टाकी विसर्जन व्यवस्था, १५ फिरती विसर्जन केंद्र, ९ खाडी घाट विसर्जन व्यवस्था आणि १० मूर्ती स्वीकृती केंद्र अशा एकूण १३४ ठिकाणी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. खाडी घाट येथे केवळ ६ फूटाच्या वरील गणेशमूर्त्यांचे विसर्जन केले जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.
विसर्जनाच्या ठिकाणी दोन सत्रात मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच घाट विसर्जनस्थळी क्रेन आणि वाढीव बार्ज ठेवण्यात येणार आहेत. तरी गणेशभक्तांनी विसर्जनस्थळी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे तसेच विसर्जनस्थळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असेही आयुक्तांनी नमूद केले. हरित विसर्जन ॲपमुळे नागरीकांना त्यांच्या नजीक परिसरात कुठे विसर्जन व्यवस्था आहे, याची माहिती मिळणार आहे. तसेच ठामपाने फिरत्या विसर्जन व्यवस्थेबाबत तयार केलेले मार्गही दिले जाणार आहे. तरी नागरिकांनी हरित विसर्जन ॲपवर नोंदणी करावी आणि शासनाचे अनुपालन करण्यास सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. https://ecovisrjan.com/ ही ॲपची लिंक आणि QR Code आहे.
प्रभाग समितीनिहाय विसर्जन व्यवस्थेचा तपशील
नौपाडा-कोपरी प्रभाग समिती
कृत्रिम तलाव – ०२
हौद (टाकी) विसर्जन व्यवस्था – ०७
मूर्ती स्वीकृती केंद्रे – ०३
खाडी घाट – ०१
फिरती विसर्जन व्यवस्था – ०१
उथळसर प्रभाग समिती
कृत्रिम तलाव – ०२
हौद (टाकी) विसर्जन व्यवस्था – ०७
मूर्ती स्वीकृती केंद्रे – ०१
फिरती विसर्जन व्यवस्था – ०१
कळवा प्रभाग समिती
कृत्रिम तलाव – ०५
हौद (टाकी) विसर्जन व्यवस्था – ०८
खाडी घाट – ०२
फिरती विसर्जन व्यवस्था – ०२
दिवा प्रभाग समिती
कृत्रिम तलाव – ०३
हौद (टाकी) विसर्जन व्यवस्था – ०९
खाडी घाट – ०१
फिरती विसर्जन व्यवस्था – ०२
मुंब्रा प्रभाग समिती
कृत्रिम तलाव – ०१
हौद (टाकी) विसर्जन व्यवस्था – ०५
खाडी घाट – ०३
फिरती विसर्जन व्यवस्था – ०१
माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती
कृत्रिम तलाव – ०८
हौद (टाकी) विसर्जन व्यवस्था – १०
खाडी घाट – ०३
फिरती विसर्जन व्यवस्था – ०२
मूर्ती स्वीकृती केंद्र – ०२
लोकमान्य नगर – सावरकर नगर प्रभाग समिती
हौद (टाकी) विसर्जन व्यवस्था – ०७
फिरती विसर्जन व्यवस्था – ०२
मूर्ती स्वीकृती केंद्र – ०१
वागळे प्रभाग समिती
कृत्रिम तलाव – ०२
हौद (टाकी) विसर्जन व्यवस्था – १०
फिरती विसर्जन व्यवस्था – ०२
मूर्ती स्वीकृती केंद्र – ०२
वर्तकनगर प्रभाग समिती
कृत्रिम तलाव – ०१
हौद (टाकी) विसर्जन व्यवस्था – ०९
फिरती विसर्जन व्यवस्था – ०२
मूर्ती स्वीकृती केंद्र – ०१