दैनंदिन देखभाल दुरुस्तीची कामांसाठी आज, बुधवारपासून पुढील ३६ तासांसाठी स्टेम प्राधिकरणाकडून ठाणे शहराला होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने ठाणेकरांपुढे पाणी टंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त होती. परंतु दैनंदिन देखभाल दुरूस्तीचे काम रद्द करण्यात आले असून यामुळे ठाणेकरांपुढील पाणी टंचाईचे संकट टळले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>कल्याण: देसई खाडी पुलावर तुळई ठेवण्याच्या कामासाठी शिळफाटा रस्ता रात्रीच्या वेळेत आठ दिवस बंद

ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २५० दशलक्षलीटर, स्टेम प्राधिकरणाकडून ११५ दशलक्षलीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्षलीटर आणि मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे हे सर्वच स्त्रोत शहरातील पाणी पुरवठ्याच्या दृष्टीकोनातून महत्वाचे मानले जातात. यापैकी स्टेम प्राधिकरणाकडून दैनंदिन देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार होती. या कामांमुळे बुधवारपासून पुढील ३६ तासांसाठी प्राधिकरणाकडून ठाणे शहराला होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार होता. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार होता. यामुळे ठाणेकरांपुढे पाणी टंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त होत होती.

हेही वाचा >>>केडीएमटी बसला बेलापूर इथे लागली आग

दरम्यान, पाणी पुरवठा बंद असलेल्या भागात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून पाणी पुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनाने केले होते. विभागवार करण्यात आलेल्या या नियोजनामुळे नागरिकांना ३६ ऐवजी १२ तास पाणी मिळणार नसल्याचा दावा पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केला होता. परंतु दैनंदिन देखभाल दुरूस्तीचे काम रद्द करण्यात आले असल्याचे स्टेम प्राधिकरणाने ठाणे महापालिकेस कळविले आहे. त्यामुळे ठाणे शहराचा पाणीपुरवठा नियमितपणे सुरु राहणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane averted a water shortage crisis due to the cancellation of remedial work by the stem authority amy
First published on: 14-12-2022 at 13:35 IST