scorecardresearch

ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे यांचं निधन

१९६७ सालच्या निवडणुकीत शिवसेनेतर्फे ठाणे नगरपालिकेवर वसंत मराठे यांची निवड झाली आणि ते ठाण्याचे नगराध्यक्ष झाले.

ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे यांचं निधन
ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे यांचं निधन

ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे यांचे शुक्रवारी सकाळी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, नात आणि नातू असा परिवार आहे. १९३४ साली जन्मलेले वसंत नारायण उर्फ योगीदास मराठे हे १९५६ सालापासून ठाण्यात राहत होते. समाजसेवेची आवड असल्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आणि त्यानंतर शिवसेनेच्या स्थापनेपासूनच त्यांचा शिवसेनेत सहभाग होता.

१९६७ सालच्या निवडणुकीत शिवसेनेतर्फे ठाणे नगरपालिकेवर त्यांची निवड झाली आणि ते ठाण्याचे नगराध्यक्ष झाले. दोन वर्ष नगराध्यक्ष आणि सहा वर्ष नगरपालिकेचे सभासद राहिले. १९९९ सालापासून श्रीमद् भगवद्गीतेचा अभ्यास, मनन, चिंतन आणि प्रवचनाच्या माध्यमातून भगवद्गीतेचा प्रचार आणि प्रसाराचे काम ते करीत होते.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-01-2022 at 19:10 IST

संबंधित बातम्या