Thane Ganesh Visarjan 2025 Know Details : ठाणे शहरातील तलाव प्रदुषित होऊ नयेत यासाठी महापालिकेकडून कृत्रिम तलाव उभारून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जन संकल्पना राबविण्यात येते. त्यास नागरिकांकडून दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळतो. यंदाही पालिकेने गणेश मूर्ती विसर्जनासाठी अशीच व्यवस्था उभारली असून त्यात गेल्यावर्षी पेक्षा यंदा विसर्जन व्यवस्थेत दिड पट वाढ करण्यात आली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात कृत्रिम तलाव आणि फिरत्या विसर्जन व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी पेक्षा दीड पट जास्तीची विसर्जन व्यवस्था केली आहे. यंदा २३ कृत्रिम तलाव, ७७ टाकी विसर्जन व्यवस्था, १५ फिरती विसर्जन केंद्र, ९ खाडी घाट विसर्जन व्यवस्था आणि १० मूर्ती स्वीकृती केंद्र अशा एकूण १३४ ठिकाणी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सहा फुटांपर्यंतच्या सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावात करण्यात येणार आहे. तर, सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित करता येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने विविध प्रभागांमध्ये मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करून विसर्जन स्थळांची व्यवस्था केली आहे. ही स्थळे कुठे आणि कशी आहे, त्याबाबत खालीलप्रमाणे माहिती

  • उथळसर प्रभाग समिती:

टाकी विसर्जन: रुस्तमजी १ व २, परुळेकर मैदान, ऋतुपार्क, परमार्थ निकेतन, सावरकर मैदान

कृत्रिम तलाव: आंबेघोसाळे, रुणवाल नगर

  • नौपाडा प्रभाग समिती:

टाकी विसर्जन: रहेजा संकुल, कशिश पार्क, कोपरी (सदगुरु गार्डन, बारा बंगला), भक्ती मंदिर, गणेश टॉकीज

कृत्रिम तलाव: मासुंदा दत्त घाट, अष्टविनायक चौकाजवळ

  • कळवा प्रभाग समिती:

टाकी विसर्जन: कळवा ९० फुट रोड, सह्याद्री शाळा, मनिषा नगर, खारेगाव, विटावा

कृत्रिम तलाव: खारीगाव, घोलाई नगर, न्यु शिवाजी नगर, विटावा रेल्वे विसर्जन घाट

  • दिवा प्रभाग समिती:

टाकी विसर्जन: बीएसयुपी दिवा, माय सिटी, रिव्हरवुड, अरिहंत आरोही, दिवा महोत्सव मैदान

कृत्रिम तलाव: दातिवली, खिडकाळी, सरस्वती शाळेजवळ

  • मुंब्रा प्रभाग समिती:

टाकी विसर्जन: शंकर मंदिर, बाबाजी पाटील वाडी, आनंद कोळीवाडा, राणानगर, रेतीबंदर

कृत्रिम तलाव: शंकर मंदिर घाटाजवळ

  • माजिवडा प्रभाग समिती:

टाकी विसर्जन: स्प्रिंग हिल, लोढा लक्झरीया, अर्बन पार्क, हायलॅण्ड मैदान, दोस्ती काउंटी

कृत्रिम तलाव: रेवाळे, ब्रम्हांड, कोलशेत, गायमुख, बाळकुम कशेळी

  • लोकमान्यनगर प्रभाग समिती:

टाकी विसर्जन: बस स्टॉप, लक्ष्मी पार्क, आचार्य आत्रे मार्ग, दोस्ती विहार, रुणवाल प्लाझा

  • वागळे प्रभाग समिती:

टाकी विसर्जन: श्रीनगर, पासपोर्ट ऑफिस, आयआयटी सर्कल, रतनबाई कंपाउंड

कृत्रिम तलाव: रायलीदेवी तलाव –१ व २

  • वर्तकनगर प्रभाग समिती:

टाकी विसर्जन: वसंत विहार, समता नगर, पवार नगर, सिध्दांचल संकुल, हाईड पार्क

कृत्रिम तलाव: उपवन परिसर, देवदयानगर, वर्तकनगर नाका