आगामी विधानसभा तसेच महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. याआधी काही महिन्यांपूर्वी त्यांनी विदर्भाचा दौरा करत मनसेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. आज ते ठाणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यांदरम्यान ते पक्षबांधणी तसेच कार्यकर्त्यांशी बातचित करत आहेत. येथे राज ठाकरेंनी टेंभी नाक्याजवळील जैन मंदिराला भेट दिली. या भेटीदरम्यान जैन मुनींनी राज ठाकरेंकडून खास अपेक्षा व्यक्त केली आहे. राज ठाकरेंनी अखंड भारत करण्याचे स्वप्न पूर्ण करावे, असे जैन मुनी म्हणाले आहेत.

हेही वाचा >> New York Airplane Crash : मृत्यू येणार हे समजलं, प्रवाशाचा बायकोला हृदय पिळवटून टाकणारा मेसेज; म्हणाला “मी तुझ्यावर…”

पाकव्याप्त काश्मीर, पाकिस्तान भारतात हवा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील टेंभीनाका येथील जैन मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. जैन मुनींचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले असता जैन मुनींनी राज ठाकरेंकडून खास अपेक्षा आहेत, असे सांगितले. “राज ठाकरे यांच्याकडून आमची एक अपेक्षा आहे. ही अपेक्षा काही छोटीमोठी नाही. मी महाराष्ट्राची तसेच भारताबद्दल बोलत नाहीये. मी अखंड भारताबद्दल बोलतोय. अजूनही अर्धा काश्मीर बाकी आहे. आम्हाला पूर्ण काश्मीर हवा आहे. आम्हाला पाकिस्तानदेखील हवा आहे. आमचे अखंड भारताचे स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे,” अशा भावना जैन मुनींनी व्यक्त केल्या.

हेही वाचा >>पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष विनंत्या, शिफारशींमुळे आले मेटाकुटीला; म्हणाले, “कृपया…!”

दरम्यान, राज ठाकरे यांनी आज जैन समाजाच्या कार्यक्रमालाही हजेरी लावली. यावेळी त्यांनी येथील लोकांशी संवाद साधला. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.