ठाणे : घोडबंदर येथील मुख्य मार्गिका सेवा रस्त्यामध्ये विलणीकरणाचे काम सुरू झाले आहे. या विलणीकरणास ठाकरे गटाने आता विरोध केला आहे. विलणीकरण झाल्यास गृहसंकुले, शाळा, महाविद्यालय आणि रुग्णालयांना अडथळा ठरणार आहे. स्थानिक रहिवाशांसाठी सेवा रस्ता महत्त्वाचा आहे. सेवा रस्त्यांचे विलणीकरण केल्यास मोठे आंदोलन हाती घ्यावे लागेल असा इशारा माजी खासदार राजन विचारे यांनी प्रशासनाला दिला.

ठाणे शहरातील विविध प्रश्नांविषयी शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. संपर्कप्रमुख नरेश मणेरा, जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहरातील विविध भागातील रहिवासी उपस्थित होते. घोडबंदर वासियांना वाहतूक कोंडीचा फटका दररोज सोसावा लागतो. घोडबंदरमध्ये ठिकठिकाणी खोदकामे सुरू करून सेवा रस्ता बंद केलेला आहे. त्यामध्ये उपाययोजना करीत असताना नागरिकांना विश्वासात घेण्याऐवजी नागरिकांच्या हक्काचा सेवा रस्ता मुख्य मार्गिकेत विलणीकरण केला जात आहे. त्यामुळे घोडबंदर सेवा रस्त्यालगत असलेली अनेक गृहसंकुले, शाळा, महाविद्यालये, रुग्णालयांना अडथळा ठरणार आहे. सेवा रस्ते येथील रहिवाशांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत.

also read

बदलापूरहून थेट मुंबई, नवी मुंबई काही मिनिटात, एक्सेस कंट्रोल महामार्गाच्या प्रकल्प आराखड्यासाठी निविदा मागवल्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे सेवा रस्ता विलणीकरण केल्यास आंदोलन छेडले जाईल असा इशारा विचारे यांनी दिला. त्यावर आयुक्त सौरभ राव यांनी आठ दिवसांमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासोबत बैठक घेऊन यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले. बदलते ठाणे अभियानाचा गाजावाजा करण्यात आला. त्यासाठी शासनाचे कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आले. मग कचरा आणि ठाण्यातील शौचालय आणि सौंदर्यकरण का बदलेले नाही. त्या कोट्यवधी रुपयांचे काय झाले ? असा प्रश्नही विचारे यांनी उपस्थित केला.