लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे: करोनाविरोधी लढ्यात थोडेही गाफील राहून नका, असा सल्ला देत करोनाच्या काळात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा निदर्शनास आला तर, नोटीस, खुलासा याची वाट न पाहता कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. लोकांमध्ये भयाचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही. संशयाचे नव्हे तर विश्वासाचे वातावरण तयार करून स्थितीचे गांभीर्य पटवून देवू आणि करोनाचा सामना करूया, असेही त्यांनी स्पष्ट केले.

gadchiroli naxalite marathi news
दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक; अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
pimpri chinchwad, drain cleaning work
पिंपरी: नालेसफाई अद्याप कागदावर!
bank of Maharashtra loan disbursement increased by 16 percent
‘महाबँके’च्या कर्ज वितरणात १६ टक्क्यांची वाढ

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या महिनाभरापासून करोना रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बुधवारी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढवा घेतला. या बैठकीस, उपायुक्त मनीष जोशी, उप वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता हमरजकर, डॉ. प्रसाद पाटील, डॉ. दीपा भंजन आणि डॉ. मनीष उबाळे यांच्यासह सर्व वैद्यकिय आरोग्य अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी सध्याची परिस्थिती हाताळण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत महत्वाच्या सुचना केल्या. तसेच, रुग्ण संख्या वाढली तर त्याचे नियोजन कसे करावे याबद्दल दिशादर्शन करण्यात आले.

आणखी वाचा- ठाणे जिल्ह्यातील काँग्रेसला पुनर्जिवत करण्याचे प्रयत्न सुरु

स्थानिक पातळीवरील आणि कर्मचारी उपलब्धता याबाबत काही अडचणी आहेत. त्याही त्यांनी यावेळी समजून घेतल्या. करोनाविरोधी लढ्यात थोडेही गाफील राहून चालणार नाही. नागरिक, खाजगी डॉक्टर या सगळ्यांना त्यांचे गांभीर्य पटवून देण्यात महापालिकेच्या आरोग्य केंद्रांची आणि तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. चांगली रुग्ण सेवा देणे आणि शक्य असलेला प्रत्येक करोना मृत्यू टाळणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यात अजिबात हयगय होऊ नये, अशा सुचना त्यांनी बैठकीत दिल्या.

नागरी आरोग्य केंद्र तसेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची करोना चाचणी करण्याचे आदेश त्यांनी दिले. चाचणीचे प्रमाण वाढल्याने आपल्याला करोनाच्या प्रसाराचा अंदाज येईल. त्यानुसार, आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या आकडेवारीनुसार, आनंदनगर, कळवा, गांधीनगर या भागात रुग्ण संख्या अधिक दिसते आहे. अशा भागात जास्त सतर्क राहावे, अशा सुचनाही त्यांनी दिल्या. आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या नियोजनाचे सर्वाधिकार हे वैद्यकिय आरोग्य अधिकाऱ्यांकडे आहेत. करोनासाठी जादा कर्मचारी घेऊन त्यांना बसवून ठेवू नये. त्यांच्याकडून गुणवत्तापूर्ण काम करून घ्यावे. आवश्यकतेनुसार आपण ऑनलाइन मीटिंगच्या माध्यमातून संपर्कात राहू.

करोनाच्या काळात कोणत्याही प्रकारची हलगर्जी होणार नाही, याची दक्षता सगळ्यांनी घ्यावी. हलगर्जी निदर्शनास आली तर नोटीस, खुलासा याची वाट न पाहता कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. चाचणी करण्याऱ्या टीमची जबाबदारी निश्चित केलेली असावी. चाचणी कोणी केली, नोंद कोणी केली, त्याचा आढावा काय घेतला याची सगळी माहिती संबंधितांनी वेळोवेळी घ्यावी. त्याचबरोबर, नागरिक, रुग्ण आणि खाजगी डॉक्टर या सगळ्यांशी बोलताना आपण सौजन्याने वागावे. तसेच, करोनाबाधित रुग्ण हे रुग्णवाहिकेतून रुग्णालयात जातील, याची दक्षता घेतली जावी, असेही त्यांनी सांगितले. खाजगी डॉक्टरच्या ओपीडीमधील रुग्णांची स्थिती त्यांच्याशी चर्चा करून जाणून घ्यावी. व्हॉट्सॲप ग्रुपवर डॉक्टरांकडून माहिती आली की त्याची उलट तपासणी न करता थेट रुग्णांशी संपर्क साधला जावा, अशा सुचनाही त्यांनी केल्या.