ठाणे : येत्या काही महिन्यात होणाऱ्या ठाणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम होताच, पालिका प्रशासनाने मंगळवारी प्रभाग आरक्षण सोडत प्रक्रीया पार पडली. यात अनुसूचित जाती ९, अनुसूचित जमाती ३, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ३५ आणि सर्वसाधारण ८४ असे १३१ जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. तसेच १३१ पैकी ६६ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या असून यामुळे पालिकेच्या सभागृहात नगरसेवकांच्या तुलनेत नगरसेविकांची संख्या अधिक दिसून येणार आहे. त्यामुळे पालिकेत यापुढे महिलाराज असणार आहे. तसेच आरक्षण बदलाचा फटका एक ते दोन ठिकाणी विद्यमान माजी नगरसेवकांना बसला असून त्यांनी आता आपल्या जागेवर पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीच्या प्रभागांची आरक्षण सोडत प्रक्रिया मंगळवारी सकाळी ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे पार पडली. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि उपायुक्त उमेश बिरारी यांनी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पाडली. ठाणे महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या अंशिका प्रजापती आणि पियु गौड या विद्यार्थींनीच्या हस्ते चिठ्ठ्या काढून प्रभागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. या सोडतीला विविध राजकीय पक्षांचे नेते, माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार तसेच नागरिक उपस्थित होते.
२०११ सालच्या जणगणनेनुसार, ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या १८ लाख ४१ हजार ४८८ इतकी होती. यात अनुसुचित जातींची लोकसंख्या १ लाख २६ हजार ३, अनुसूचित जमातीची लोकसंख्या ४२ हजार ६९८ इतकी आहे. या आधारेच पालिकेने ३३ प्रभागांची रचना केली होती. यात ४ सदस्यांचे ३२ तर, ३ सदस्यांचा एक प्रभागाचा समावेश आहे. या आराखड्यानुसार प्रत्येक प्रभागात (अ, ब, क, ड) अशी जागा असून, एकूण १३१ नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. लोकसंख्येच्या आधारे पालिकेच्या निवडणुक विभागाने प्रभागांचे आरक्षण निश्चित केले. त्यानुसार, अनुसूचित जाती ९, अनुसूचित जमाती ३, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ३५ आणि सर्वसाधारण ८४ असे १३१ जागांसाठी आरक्षित करण्यात आले.
महिलांचा दबदबा
ठाणे महापालिकेच्या एकूण ३३ प्रभागांमधून १३१ नगरसेवक निवड केली जाणार आहे. १३१ पैकी ६६ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. यात अनुसूचित जाती ५, अनुसूचित जमाती २, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग १८ आणि सर्वसाधारण ४१ अशा ६६ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पालिकेत यापुढे महिलाराज असणार आहे.
असे आहे प्रभागांचे आरक्षण
ठाणे महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाले असून यात ३ (अ) महिला, ६ (महिला), ७ (महिला), ९ (अ), १५ (अ), १६ (अ), २२ (अ) महिला, २४ (अ) महिला, २८ (अ) हे प्रभाग अनुसुचित जातींसाठी आरक्षित झाल आहेत. तर, १ (अ), २ (अ) महिला, ५ (अ) महिला हे प्रभाग अनुसुचित जमातींसाठी आरक्षित झाले आहेत. १(ब), ३ (ब), ८ (अ), ६ (ब), ७ (ब), ९ (ब), १० (अ), १४ (अ), १५ (ब), १६ (ब), १७ (अ), १९ (अ), २४ (ब), २६ (अ), २८ (ब), २९ (अ), ३० (ब), ३३ (ब) हे प्रभाग नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी राखीव आहेत तर, २(ब), ४(अ), ५ (ब), ११ (अ), १२ (अ), १३ (अ), १८ (अ), २० (अ), २१ (अ), २२ (ब), २३ (अ), २५ (अ), २७ (अ), ३० (अ), ३१ (अ), ३२ (अ), ३३ (अ) हे प्रभाग नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. तर, १(क), २(क), ४(ब, क), ५ (क), ८ (ब), ९ (क), १० (ब), ११(ब, क), १२ (ब, क ), १३(ब, क), १४ (ब), १५ (क), १६ (क), १७ (ब), १८ (ब, क), १९ (ब), २० (ब, क),२१ (ब, क), २२ (क), २३ (ब, क), २५ (ब, क), २६ (ब), २७ (ब, क), २८ (क), २९ (ब), ३० (क), ३१ (ब, क), ३२ (ब, क), ३३ (क)
