ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन खात्याचा २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. यावर्षीच्या अर्थसंकल्पात तब्बल ११५ कोटी ३२ लाखांची वाढ झाली आहे. २०१६ -१७ साली १५२.९० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. यावर्षी २६८.२२ कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. अर्थसंकल्पात वाढ दिसून येत असली तरी, २१२.४६ कोटींचे अनुदान ठाणे महापालिकेकडून मागितले आहे. त्यामुळे ‘टीएमटी’चे स्वतःचे असे काय आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच वेबसाईट सुरु करण्याबरोबरच महिला चालक आणि वाहकांचीही भरती करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिकेच्या डबघाईला आलेल्या परिवहन सेवेला अनुदानातून जीवनदान देण्याचा प्रयत्न यावर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. आज परिवहन सेवेचे २०१६-१७ चे सुधारित आणि १७-१८ चे मूळ अंदाजपत्रक परिवहन व्यवस्थापक सुधीर राऊत, परिवहन समिती सभापती दशरथ यादव आणि परिवहन सदस्य यांच्यासमोर मांडण्यात आले.

ठळक वैशिष्ट्ये:

> २०१६-१७ चे सुधारित अंदाजपत्रक १५२.९० कोटी

> २०१७-१८ चे अंदाजपत्रक २६८.२२ कोटी

> महापालिकेकडे यावर्षी १३६.१३ कोटींच्या अनुदानाची मागणी

> एकूण बस ३५३ असून त्यापैकी केवळ १८० ते १८५ बस सेवेत

> येत्या आर्थिक वर्षात तिकीट विक्रीतून १२२.८३ कोटींचे उत्पन्न अपेक्षित

> यावर्षीच्या अंदाजपत्रकात अनेक चांगल्या गोष्टी करण्याचे ठरविले आहे.

> ‘जेएनएनयूआरएम’अंतर्गत ठाणे महापालिकेला येणाऱ्या १९० बसपैकी उर्वरित ९० बसही जूनपर्यंत उपलब्ध होणार
> परिवहन व्यवस्थापकांची माहिती

> १०० एसी इलेक्ट्रीक बस, १०० बायोइथेनॉलवर चालणाऱ्या बस, इटीआयएमद्वारा तिकिटे,
परिवहन सेवेच्या माहितीसाठी अद्ययावत वेबसाईट, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांना प्रवासी भाड्यात सवलत

> फक्त महिलांसाठी ‘तेजस्विनी बस’

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane municipal transport tmt budget 2017 recruitment for drivers and conductors
First published on: 24-03-2017 at 16:51 IST