शिळफाटा येथील दहीसर भागात एका वाहनाच्या धडकेत बिलाल शेख (३५) याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी शिळफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिलाल हा शिळफाटा भागात राहत होता. सोमवारी रात्री तो कमानिमित्ताने घराबाहेर पडला होता. मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह पनवेल मुंब्रा मार्गावरील दहीसर भागात रस्त्याकडेला आढळला. याप्रकरणी बिलालच्या भावाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane one died in an accident amy
First published on: 17-08-2022 at 11:54 IST