ठाणे : पुणे येथून ठाण्यात गांजा हा अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोन महिलांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने खोपट एसटी थांबा येथून अटक केली. रेणुका शर्मा (३७) आणि संगीता राठोड (४२) अशी अटकेत असलेल्या महिलांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून १० किलो वजनाचा गांजा जप्त केला आहे. महिलांनी सुटकेस आणि बॅगमध्ये छुप्या पद्धतीने हा गांजा आणला होता. बसगाडीने त्या ठाण्यात येत होत्या.

पुणे येथून दोन महिला शनिवारी गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या मालमत्ता शोध कक्षास मिळाली होती. या माहितीच्या आधारे, शनिवारी रात्री पथकांनी खोपट येथील एसटी थांब्याजवळ सापळा रचला होता. त्याचवेळी दोन महिला हातामध्ये बॅक आणि सुटकेस घेऊन बसगाडीमधून खाली उतरताना पथकाला दिसल्या. पथकाला संशय आल्याने त्यांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेऊन अडविले. त्यांच्या हातातील बॅग आणि सूटकेसची तपासणी केली असता, त्यामध्ये १० किलो १३४ ग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ आढळून आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, त्यांची विचारणा केली असता, त्यांनी त्यांचे नाव रेणुका आणि संगीता असल्याचे सांगितले. तसेच त्या पुण्यातील चिखली येथील रहिवासी असल्याचे समोर आले. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रेणुका आणि संगीता यांना अटक केली आहे.