ठाणे – प्रेषित मोहम्मद यांच्यावर अवमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी भाजपतून हकालपट्टी करण्यात आलेले नवीनकुमार जिंदाल यांना ठाणे पोलिसांनी समन्स बजावले आहे. नवीनकुमार जिंदालविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. जिंदाल यांना १५ जूनला जबाबासाठी हजर राहण्याचे समन्समध्ये म्हटले आहे.
नवीनकुमार जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर अवमानकारक टिप्पणी केली होती. त्यानंतर भिवंडीतील रजा अकादमीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि काही मुस्लिम संघटनांनी जिंदाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची विनंती पोलिसांकडे केली होती.
हेही वाचा : ‘प्रेषित मोहम्मद यांचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवणार’; अजित डोवाल यांनी आश्वासन दिल्याचा इराणचा दावा
यानंतर नवीनकुमार जिंदालविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी आता जिंदाल यांना इमेल द्वारे समन्स बजावले आहे. तसेच १५ जूनला जबाबासाठी हजर राहण्याचे म्हटले आहे.
