आनंदनगर टोल नाका ते तीन हात नाका पर्यंत वाहनांच्या रांगा

Heavy Rain Update, Thane ठाणे – मुंबई, नवीमुंबई तसेच ठाणे शहरात रविवारी रात्री मुसळधार पाऊस कोसळत होता. सोमवारी पहाटेपासून पावसाचा जोर कायम आहे. या पावसाचा फटका सोमवारी सकाळी नोकरीसाठी निघालेल्या नोकरदारवर्गाला बसला. ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मर्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

आनंदनगर टोल नाक्यापासून ते तीन हात नाका उड्डाणपुलापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. तर, शहरातील अंतर्गत भागातील रस्त्यावर देखील वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे शहराला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यानुसार, रविवारी मध्यरात्री पासून पावसाचा जोर काय असून अनेक सखल भागात पाणी साचले आहे.

सोमवारी सकाळी कामानिमित्त निघालेल्या नोकरदारवर्गाला या पावसाचा फटका बसला आहे. या पावसामुळे रेल्वे वाहतूकीसह रस्ते वाहतूकीवर देखील परिणाम झाला आहे. पावसामुळे शहराअंतर्गत तसेच महामर्गावरील काही रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरु आहे. आधिच रस्त्यावर पडलेले खड्डे त्यात पाऊस यामुळे शहरातील अनेक रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहे. ठाणे शहरातून मोठ्यासंख्येने नोकरदार वर्ग हा मुंबईत कामानिमित्त जात असताता.

प्रत्येकाला रेल्वेने वाहतूक करणे शक्य नसते यासाठी आपली खासगी वाहने घेऊन ही मंडळी मुंबईत जात असतात. ठाण्यातील कोपरी येथील आनंदनगर नाक्याहून ही वाहने मुंबईत प्रवेश करतात. आज, सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे आनंद नगर जकात नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक संथ गतीने सुरु असल्यामुळे त्याचा फटका तीन हाता नाका उड्डाणपुलापर्यंत झाला आहे.

अनेक वाहने बराच वेळ या कोंडीत अडकून आहेत. एकीकडे रेल्वे सेवा विस्कळीत तर, दुसरीकडे रस्ते मर्गावर कोंडी यामुळे नोकरदार वर्गाची कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास कसरत सुरु आहे. तर, ठाणे हून घोडबंदर कडे जाणाऱ्या मर्गावर गायमुख घाटामध्ये अवजड वाहन बंद पडले आहे. वाहतूक विभागाकडून क्रेनच्या सहाय्याने हे वाहन बाजूला करण्याचे काम सुरु आहे. परंतू, हे वाहन बंद पडल्याने यामार्गावरही वाहतूक कोंडी झाली आहे. ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे मागील २४ तासात २९.७० मिमी पाऊस पडला असल्याची नोंद करण्यात आली आहे. यापावसामुळे शहरातील काही सखल भागात पाणी साचले आहे.