ठाणे : ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतील पिसे आणि टेमघर जलशुध्दीकरण केंद्रातील यंत्रांची दुरुस्ती केली जाणार आहे. या कामासाठी बुधवारी, १५ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ९ वाजेपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत ठाण्यातील काही भागातील पाणी पुरवठा बंद असणार आहे. तर स्टेम प्राधिकरणाचा पाणी पुरवठा टप्प्याटप्प्याने सुरु ठेवण्यात येणार आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतील पिसे व टेमघर जलशुध्दीकरण केंद्रातील उच्चदाब सबस्टेशन मधील आवश्यक कामे करणे, कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशन करणे व इतर आवश्यक कामे बुधवारी नियोजन करण्यात आले आहे.
त्याअनुषंगाने बुधवार सकाळी ९.०० वाजेपासून रात्री ९ वाजेपर्यंत १२ तासाचा स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचा शटडाऊन घेणे आवश्यक आहे. या दिवशी मे.स्टेम प्राधिकरणाचा पाणी पुरवठा झोनिंग करुन सुरु ठेवण्यात येणार आहे.
या भागातील पाणी पुरवठा असेल बंद
ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतील पिसे आणि टेमघर जलशुध्दीकरण केंद्रातील यंत्राची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेने शहरातील काही भागाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, बुधवारी सकाळी ९ वाजेपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत घोडबंदर रोड, वर्तकनगर, ऋतुपार्क, कारागृह परिसर, गांधीनगर, रुस्तमजी, सिध्दांचल, समतानगर, सिध्देश्वर, इटर्निटी, जॉन्सन आणि कळवा शहरातील काही भागातील पाणी पुरवठा १२ तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे अशी माहिती ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली.