ठाणे येथील मखमली तलावात शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. ठाणे आपत्ती व्यवस्थापन दलाचे आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी यांनी हा मृतदेह बाहेर काढला. महिलेचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याबाबत नौपाडा पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> ठाणे : लायसन्स नसतानाही कार शिकणाऱ्या महिलेनं ब्रेकऐवजी क्लच दाबल्याने डिलेव्हरी बॉय गाडी खाली आला; उपचारापूर्वीच मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे शहराच्या पश्चिम भागात मखमली तलाव आहे. या तलावाच्या परिसरात नागरिकांची कायम वर्दळ असते. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास नागरिकांना तलावात तरंगत असलेला एक मृतदेह दिसून आला. नागरिकांनी याची माहिती लागलीच पोलिसांनी दिली. यावेळी नौपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. तलावात आढळून आलेला हा मृतदेह एका ५० ते ५५ वय असलेल्या महिलेचा असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यानंतर मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात देण्यात आला आहे. तर याबातच अधिक तपास पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे.