ठाणे : महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यु झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर सर्वत्र टिका होऊ लागली असतानाच, याच रुग्णालयातील रुग्णावर चुकीचे उपचार सुरु होते, अशी माहिती पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. या रुग्णालयात एका महिलेला अर्धांगवायुच्या आजारावर उपचार सुरु होते. पण, खासगी रुग्णालयात हलविल्यानंतर तिला अर्धांगवायुचा नव्हे तर निमोनियाचा आजार असल्याची धक्कादायक मनसेने उघडकीस आणली आहे. यानिमित्ताने कळवा रुग्णालयातील भोंगळ कारभार समोर आला आहे.

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शनिवारी रात्री १८ रुग्णांचा मृत्यु झाला. याच दिवशी कोलशेत भागात राहणाऱ्या शकुंतला वाल्मिकी (६०) यांना त्यांच्या मुलाने कळवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्याबाबतीत हा प्रकार घडला आहे. त्यांच्यावर समान्य कक्षात तिच्यावर उपचार सुरु होते. तिथे दुसऱ्यादिवशी त्यांची प्रकृती गंभीर झाली. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात येणार होते. त्याच वेळी १८ जणांच्या मृत्युच्या बातमीमुळे त्यांचे नातेवाईक घाबरले आणि तिथे रुग्णालयाला जाब विचारण्यासाठी आलेले मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची भेट घेतली. आम्हाला रुग्णाला खासगी रुग्णालयात नेण्यास तयार आहोत पण, डाॅक्टर नेऊ देत नाहीत, असे त्यांनी सांगताच जाधव यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने त्या रुग्णाला मानपाडा येथील ऑस्कर या खासगी रुग्णालयात दाखल केले. या रुग्णालयात उपचारादरम्यान समोर आलेल्या माहितीच्या आधारे अविनाश जाधव यांनी कळवा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. शकुंतला यांच्यावर कळवा रुग्णालयात अर्धांगवायुच्या आजारावर उपचार सुरु होते. पण, खासगी रुग्णालयात हलविल्यानंतर त्यांना अर्धांगवायुचा नव्हे तर निमोनियाचा आजार असल्याचे समोर आल्याचा दावा करत शकुंतला यांच्यावर कळवा रुग्णालयात चुकीचे उपचार सुरु होते असा आरोप जाधव यांनी केला आहे.

manoj jarange
मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल
yavatmal, Cows Die After Eating Stale Food, karykarta s Birthday Party, election Campaign Rally, pandharkawada taluka, yavatmal district, yavatmal news, maha vikas aghadi, lok sabha election, election campaign, sanjay deshmukh, marathi news, yavatmal news,
शिळे अन्न खाल्ल्याने सहा गायींचा मृत्यू, वाढदिवसाचे भोजन जनावरांच्या जीवावर बेतले; पांढरकवडा तालुक्यातील घटना
Over 100 Private Hospitals in Pune Operate Without Renewed Licenses
धक्कादायक! पुण्यात शंभरहून अधिक रुग्णालये विनापरवाना
high court ask Questions to bmc and sent notice over Tragic Deaths of children in Wadala
दोन मुलांच्या मृत्यूचे प्रकरण: मुंबईत मानवी जिवाची किंमत काय? उच्च न्यायालयाचा महापालिकेला प्रश्न

हेही वाचा >>>डोंबिवली : शिळफाटा चौकात वाहतूक सेवकांच्या उपद्रवाने प्रवासी हैराण

या वृत्तास शकुंतला यांचा मुलगा किरण यांनीही दुजोरा दिला आहे. आईच्या फुफ्फसात संसर्ग झाला असून तिथे पाणी साचले आहे. रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु असून तिची प्रकृती आता ठिक आहे, असे किरण यांनी सांगितले. शकुंतला वाल्मिकी यांना निमोनिया झाला होता. त्यांना अर्धांगवायुचा झटका आला नव्हता. याबाबत ऑस्कर रुग्णालयात जाऊन त्याची माहिती घेऊ शकता. कळवा रुग्णालयातील हे एक उदाहरण आहे. एक आजार असेल आणि इलाज दुसरा होत असले तर लोक मरणारच आहेत. या रुग्णालयात जाणारा माणुस हा गरीब असतो. त्याचे शिक्षण कमी असते. त्यामुळे रुग्णालयातील डाॅक्टरांना कुणीच प्रश्न विचारत नाहीत. रुग्णालयातील डाॅक्टर काॅपी करून पास झालेले असून ते आमचा जीव घेण्यासाठी बसविले आहेत. यांची पुन्हा परिक्षा घ्या नाहीतर आणखी जीव जातील. सुदैवाने त्या शकुंतला यांच्या मुलांनी वेळीच माहिती दिल्याने आज त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, याचे समाधान वाटते, अशी प्रतिक्रिया मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.

हेही वाचा >>>कल्याणमध्ये आडिवलीतील नैसर्गिक स्त्रोत बुजविणारी बेकायदा इमारत भुईसपाट

आजही चार रुग्णांचा मृत्यु

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सोमवारीही ४ रुग्ण दगावले असून त्यात एका महिन्याचा बाळाचा समावेश आहे. या बाळाला तीन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उलटी आणि अंगाला सूज आल्याने त्याच्यावर उपचार सुरु होते. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता या बाळाला मृत्यु झाला. तर, दुसरा रुग्ण रुग्णालयात येण्यापुर्वीच मृत पावलेला होता. तिसऱ्या रुग्णावर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला आहे तर चौथ्या रुग्णावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.