डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील कस्तुरी प्लाझा समोरील एका बांधकामाच्या ठिकाणी एक अवजड ट्रक खडी घेऊन चालला होता. रस्ता ओलांडून ट्रक पदपथावरुन बांधकामाच्या ठिकाणी जात असताना अचानक पदपथाचा काही भाग बुधवारी खचला. ट्रकचे मागचे चाक गटारात अडकले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- बेकायदा बांधकाम करणाऱ्यांवर एमआरटीपीचे गुन्हे दाखल; ठाणे महापालिका आयुक्तांचा अतिक्रमण विभागाला आदेश

मानपाडा रस्त्याच्या छेद रस्त्याच्या आतील भागात हा प्रकार घडला. ट्रकचे चाक पदपथावरील गटारात अडकताच काही वेळ या भागात कोंडी झाली. बांधकामधारकाने तात्काळ जेसीबी पाचारण करुन ट्रकमधील खडी काढून टाकली. त्यानंतर ट्रकचे चाक गटारातून बाहेर काढण्यात आले. वर्दळीच्या गल्लीत ट्रक अडकल्याने काही वेळ या भागातील वाहतूक खोळंबली होती. खडी रस्त्याच्या बाजूला काढताना आजूबाजूच्या दुकानांमध्ये धुळीचा धुरळा गेल्याने दुकानदार त्रस्त झाले होते. काही महिन्यापूर्वी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील एक भुयारी गटारात विटा वाहू ट्रकचे चाक अडकले होते. नांदिवलीमध्ये अशाच प्रकारे गटारात ट्रकचे चाक रुतले होते.

हेही वाचा- ठाण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात क्लस्टरचा अडसर; आमदार संजय केळकर यांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र

कस्तुरी प्लाझा समोरील नवीन पदपथ तयार करताना त्यावेळी कोणतेही पक्के बांधकाम पदपथाच्या आतील भागात करण्यात आले नाही. फक्त वरच्या भागातील लाद्या बदलण्यात आल्या. पदपथाचा वरील भाग नवीन दिसत असला तरी आतील भाग कच्चा राहिला. त्यामुळे हा अपघात घडला, असा आरोप शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शाखाप्रमुख संदीप नाईक यांनी केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The pavements were worn out and the wheels of the heavy trucks rolled into the drains in dombivli dpj
First published on: 07-12-2022 at 18:10 IST