ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. ठाणे पोलीस दलातील १६ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या यामध्ये करण्यात आल्या असून, यामध्ये नवी मुंबई आणि मुंबई पोलीस दलातून ठाणे पोलीस दलात हजर झालेल्या पोलीस निरीक्षकांचाही सामावेश आहे. नियमानुसार पोलीस निरीक्षकास एकाच पोलीस ठाण्यात किमान दोन वर्षांचा कालावधी पूर्ण करावा लागत असतो. परंतु, मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांची अवघ्या १० महिन्यांमध्ये बदली करण्यात आली आहे. गेल्याकाही दिवसांपासून आमदार जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये अंतर्गत मोठी धुसफूस सुरू आहे. त्यामुळे या बदलीमागे राजकीय किणार असल्याच्या चर्चा पोलीस दलात सुरू झाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या ठाणे पोलीस दलात करण्यात आल्या आहे. तर एका साहाय्यक पोलीस आयुक्ताची बदली करण्यात आली आहे. त्यानुसार, उल्हासनगर वाहतूक शाखेचे साहाय्यक पोलीस आयुक्त इंद्रजित कार्ले यांची गुन्हे अन्वेषण शाखेत बदली करण्यात आली आहे. कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हे अन्वेषण शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी प्रभारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली. तर कोपरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोझा यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांची बदली थेट विशेष शाखेत करण्यात आली आहे. यातील बहुतांश अधिकारी हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात बदली झालेले आहेत. यातील अशोक कडलग यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात केवळ १० महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. नियमानुसार, एखाद्या पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकास किमान दोन वर्षांचा कालावधी पूर्ण करावा लागतो. परंतु कडलग यांची १० महिन्यांतच उचलबांगडी करण्यात आली आहे.

हेही वाचा – कल्याण-वसई राष्ट्रीय जलमार्ग: भिवंडी जवळील काल्हेर येथे पाणतळ कामासाठी निविदा प्रक्रियेला प्रारंभ

ठाण्यात राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये विविध प्रकल्पाच्या मुद्दावरून श्रेयवादाची स्पर्धा सुरू झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपच्या महिला पदाधिकारी रिदा रशीद यांनी विनयभंगाची तक्रार मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर रिदा रशीद यांच्यावरही वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्रा-कळवा हा भाग खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातील आहे. राष्ट्रवादीचे मुंब्रा-कळवा येथील काही नगरसेवक शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता मुंब्रा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी असलेले कडलग यांची अचानक बदली करण्यात आल्याने या बदलीमागे राजकीय किणार असल्याची चर्चा पोलीस दलात सुरू झाली आहे.

हेही वाचा – डोंबिवलीत तृण धान्यांचे प्रदर्शन; शरीर सुदृढतेसाठी पौष्टिक तृणधान्ये महत्वाची; ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. उल्हास कोल्हटकर यांची माहिती

नवी मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांची मुंब्रा पोलीस ठाणे, मुंबई शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांची अंबरनाथ, मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांची विशेष शाखेत, मुंबई पोलीस दलातील पोलीस निरीक्षक संजय पवार यांची मुंब्रा, मुंबई पोलीस दलातील अशोक ठुबे यांची वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात, भोईवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण यांची नारपोली, निजामपुरा पोलीस ठाण्याच पोलीस निरीक्षक दिप बने यांची कोनगाव, कोपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश सोंडकर यांची विशेष शाखेत, कोपरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोझा यांची नियंत्रण कक्षात, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे यांची कोपरी, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर खोत यांची शहर वाहतूक कक्षात, शहर वाहतूक शाखेचे तुकाराम पवळे यांची विशेष शाखेत, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शहाजी शिरोळे विशेष शाखेत, शहर वाहतूक शाखेचे सुखदेव पाटील यांची विशेष शाखा, भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांची गुन्हे अन्वेषण शाखा, शिळ-डायघर पोलीस निरीक्षक गोविंद आरळेकर यांची मानपाडा पोलीस ठाणे, शिळडायघर पोलीस ठाण्याच्या साहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली पोळ यांची गुन्हे अन्वेषण शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, नौपाडा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक मंगलसिंग चव्हाण यांची गुन्हे अन्वेषण शाखेच्या सायबर सेल कक्षात बदली करण्यात आली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The transfer of an police officer in mumbra police station within 10 months sparked political discussions ssb
First published on: 08-02-2023 at 15:35 IST