अट्टल चोरटे अटकेत ; भिवंडीतील चोरीचे १६ गुन्हे उघडकीस | thieves arrested in Bhiwandi amy 95 | Loksatta

अट्टल चोरटे अटकेत ; भिवंडीतील चोरीचे १६ गुन्हे उघडकीस

भिवंडी शहरात मोबाईल, सोनसाखळी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या चार जणांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे.

अट्टल चोरटे अटकेत ; भिवंडीतील चोरीचे १६ गुन्हे उघडकीस
अंमली पदार्थ आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोघांना अटक (प्रातिनिधिक छायाचित्र)

भिवंडी शहरात मोबाईल, सोनसाखळी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या चार जणांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. सुनील फुलारे (३०), आयाजअली अन्सारी (३८), दाऊद अन्सारी (२८) आणि सर्फराज खान (२६) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून ८ लाख १७ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हेही वाचा >>> कल्याण डोंबिवली महापालिकेतील सावळागोंधळ आणि भाजपला चटके

भिवंडीत गेल्याकाही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने उपायुक्त योगेश चव्हाण यांनी कठोर कारवाई करण्याची सूचना सर्वच पोलीस ठाण्यांतील अधिकाऱ्यांना दिली होती. दरम्यान, भिवंडीचे साहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले, यांच्या मार्गदर्शनाखाली शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांनी विविध प्रकरणात कारवाई करून सुनील, अयाजअली, दाऊद आणि सर्फराज यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून शांतीनगर पोलीस ठाण्यातील १३, भिवंडी पोलीस ठाण्यातील दोन आणि नारपोली पोलीस ठाण्यातील एक असे १६ गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच आरोपींकडून पोलिसांनी दोन सोनसाखळ्या, ११ दुचाकी, एक रिक्षा, एक मोबाईल असा ८ लाख १७ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चारही जणांना अटक केली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
टिटवाळा रेल्वे स्थानकात झवेरी बाजारातील व्यापाऱ्याकडून १ कोटी ७१ लाख हस्तगत; टिटवाळा रेल्वे सुरक्षा बळाची कारवाई

संबंधित बातम्या

ठाणे : महिला पोलीस कर्मचाऱ्याची पोलीस ठाण्यात आत्महत्या
बनावट परवानग्यांद्वारे ‘रेरा’ प्रमाणपत्र मिळविल्याबद्दल डोंबिवलीतील ३८ भूमाफियांवर फौजदारी गुन्हे दाखल
उपमहापौर गोत्यात!
नेम शिवसेनेवर.. लक्ष्य आयुक्त!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Optical Illusion: या फोटोत लपलेला अस्वल तुम्हाला दिसला का? उत्तर जाणून अचंबित व्हाल
चंद्रपूर : बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील पूलाचा भाग कोसळला, २० जखमी; ८ जणांची प्रकृती गंभीर
Video: “मी अवली लवली…” हास्यजत्रेतील ‘कोहली’ फॅमिलीचा चाहत्याने एडिट केलेला भन्नाट व्हिडीओ पाहिलात का?
विश्लेषण : भारतात लवकरच होणार ‘टिल्टिंग रेल्वे’चं आगमान, काय आहेत खास वैशिष्ट्ये?
लघवीतून येणाऱ्या दुर्गंधीचा ‘या’ ५ गंभीर आजारांशी असू शकतो संबंध; वेळीच ओळखा आणि हे उपाय करा