लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: टिटवाळा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकलमध्ये अज्ञात व्यक्तीने मानवी विष्ठेची घाण करुन ठेवल्याने या डब्याकडे शनिवारी सकाळी प्रवाशांनी पाठ फिरवली. ही जलद लोकल सकाळी १० वाजता टिटवाळ्याहून मुंबईकडे रवाना होते. लोकल फलाटावर आली की प्रवासी रिकामा डबा पाहून चढण्याची घाई करायची पण तेच प्रवासी काही क्षणात डब्यात घाण पाहून खाली उतरत होते.

डब्यातील सर्व आसने, उभे राहण्याच्या जागेत अज्ञाताने ही घाण केली आहे. गर्दीत जाण्यापेक्षा काही प्रवाशांनी या डब्याच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणे पसंत केले. अज्ञात व्यक्ती डब्यात येऊन घाण करेपर्यंत फलाटावरील गस्तीवरील रेल्वे सुरक्षा जवान काय करत असतात, असा प्रश्न प्रवाशांकडून केला जात आहे.

आणखी वाचा- ननावरे दाम्पत्य आत्महत्येप्रकरणी आमदार बालाजी किणीकर यांच्या पीएसह चारजण अटकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही जागरुक प्रवाशांनी ही माहिती रेल्वेच्या वरिष्ठांना दिली आहे. मद्यपी, गर्दुल्ल्यांनी हा प्रकार केला असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. टिटवाळा लोकल मुंबईकडे जाताना थांबे असणाऱ्या स्थानकात लोकल आली की प्रवासी या रिकाम्या डब्यात चढण्याला पसंती देत होते. काही क्षणात त्यांचा हिरमोड होऊन ते नाके मुरडत डब्यातून खाली उतरत होते.