ठाण्याच्या वागळे इस्टेट आणि कोलशेत या भागांतील विद्युतपुरवठा वाहिन्यांच्या देखभालीचे काम करण्यात येणार असल्याने या भागांमधील विद्युतपुरवठा शुक्रवारी (३१ जुलै) बंद राहणार आहे. वागळे इस्टेट परिसरातील एस.डी.नगर, अंबिकानगर, राजीव गांधीनगर, विश्वशांतीनगर, जय भवानीनगर, पाइप लाइन, वागळे इस्टेट पोलीस स्टेशन, रस्ता क्रमांक-१६, २९ आणि ३०, ३१ आंबेवाडी, फीडर क्र.१ एम.आय.डी.सी. परिसर, पाणीपुरवठा, ईएसआय हॉस्पिटल, कृषी कार्यालय, औद्य्ोगिक विभाग, वागळे इस्टेट पाणीपुरवठा विभाग, रुपादेवी पाडा, रस्ता क्रमांक २४, २५ हनुमाननगर, रामनगर, सी पी तलाव, शांती नगर, किसननगर, एमआयडीसी तसेच साकेत या वीजवाहिनीवरील लोढा पॅरेडाईज, साकेत कॉम्प्लेक्स, रुस्तमजी बिल्डर्स, बाळकुम, आकाशगंगा सोसायटी या भागांमध्ये विद्युतपुरवठा बंद राहणार आहे. राबोडी २२ के.व्ही. कळवा -१ या वीजवाहिनीवरील विटावा गाव, भवानी चौक, सूर्यानगर, कोळीवाडा, विटावा नाका या भागांमधील वीजपुरवठा सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत बंद राहणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 31st Jul 2015 रोजी प्रकाशित
ठाण्यात आज वीज नाही
ठाण्याच्या वागळे इस्टेट आणि कोलशेत या भागांतील विद्युतपुरवठा वाहिन्यांच्या देखभालीचे काम करण्यात येणार असल्याने या भागांमधील विद्युतपुरवठा शुक्रवारी (३१ जुलै) बंद राहणार आहे.

First published on: 31-07-2015 at 04:20 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today no electricity in thane