मुंबई – नाशिक महामार्गावरील वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ठाणे ते वडपे या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे . यामुळे ठाणे वाहतूक शाखेने मुंबई – नाशिक महामार्गावरील साकेत पुलाजवळील साकेत संकुलाच्या दिशेने जाणाऱ्या अंतर्गत मार्गिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. हे वाहतूक बदल रविवार, ६ मार्च पासून ते परिसरातील रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत असणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस विभागातर्फे देण्यात आली आहे.

मुंबई – नाशिक महामार्गावरुन दररोज हजारो वाहने ये-जा करत असतात. परंतु, अरुंद रस्त्यामुळे दररोज या मार्गावर चालकांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत असतो. ही कोंडी सोडविण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे या रस्त्याच्या रुंदिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून साकेत पुलाजवळील रुंदीकरणाचे काम ६ मार्च पासून सुरु होणार आहे. या पार्श्वभूमिवर साकेत पुलाजवळील साकेत संकुलाच्या दिशेने जाणाऱ्या अंतर्गत मार्गिका वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. तर येथील वाहन चालकांना ६ मार्च पासुन ते परीसरातील रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना वाहतूक शाखेने केल्या आहेत.

असे आहेत वाहतूक बदल

मुंबई – नाशिक महामार्गावरील साकेत खाडी पुलाजवळून साकेत संकुलाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तर या वाहनांना खारेगाव टोलनाका येथे डावीकडे वळण घेउन जाता येणार आहे.

निवडणुकांपूर्वीच ठाणे महानगर पालिकेवर ‘भगवा’; शिवशिल्पाच्या निमित्ताने अनेकांच्या भुवया उंचावल्या!

बाळकुमहून मुंबई- नाशिक महामार्गाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना साकेत खाडी पुलाखाली प्रवेश बंद करण्यात आला आहे. येथील वाहनांना महालक्ष्मी मंदिरा समोरून उजवीकडे वळण घेऊन अग्निशमन केंद्रासमोरून माजिवाडा पुलाखालून जाता येणार आहे.