कल्याण – द इन्स्टिट्युट ऑफ चार्टड अकाऊंन्टट ऑफ इंडिया, कल्याण डोंबिवली शाखा आणि याच संस्थेच्या डायरेक्ट टॅक्स समितीतर्फे येत्या ७ आणि ८ ऑगस्ट रोजी डायरेक्ट टॅक्स परिषदेचे आयोजन कल्याणमध्ये केले आहे. ज्ञानसंगम नावाने आयोजित केलेली ही परिषद कल्याण पश्चिमेतील प्रसाद हाॅटेल येथील परिषद सभागृहात होणार आहे.
सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या परिषदेच्या सत्रात डायरेक्ट टॅक्स विषयावर काही तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. सात तारखेच्या दिवसभराच्या सत्रात ‘टीडीएस आणि त्यासंबंधी निर्माण झालेले विषय आणि वाद’ विषयावर ज्येष्ठ सनदी लेखापाल पीयुष छाजेड, ‘सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील काही धोरणात्मक निकालांच्या निर्णयांच्या’ विषयावर ज्येष्ठ सनदी लेखापाल विष्णु कुमार अग्रवाल, ‘कर मूल्यमापन, रचना आणि खासगी संस्थांचे त्यासंबंधी नियोजन’ विषयावर ज्येष्ठ सनदी लेखापाल डाॅ. गिरीश आहुजा मार्गदर्शन करणार आहेत.
आठ तारखेला दिवसभराच्या सत्रात ‘आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा, बेनामी व्यवहार आणि यासंबंधीचे कुलमुखत्यार आणि सत्यप्रतिज्ञापत्र’ विषयावर ज्येष्ठ सनदी लेखापाल राजेश संघवी, ‘दंडात्मक तरतुदींच्या’ विषयावर डाॅ. ॲड. कपील गोयल, ‘भांडवली लाभ, विकासकांच्या उलाढालीचे मूल्यांकन’ विषयावर ज्येष्ठ सनदी लेखापाल विमल पुनमिया मार्गदर्शन करणार आहेत.
या दोन दिवसांच्या परिषदेच्या यशस्वीतेसाठी सनदी लेेखापाल संस्थेच्या कल्याण डोंबिवली शाखेचे अध्यक्ष सनदी लेखापाल राकेश अग्रवाल, उपाध्यक्ष सनदी लेखापाल अमित मोहरे, सचिव सनदी लेखापाल प्रदीप मेहता, कोषाध्यक्ष सनदी लेखापाल विपुल शहा, सनदी लेखापाल अनुराग गुप्ता यांच्या बरोबर या शाखेतील सदस्य सनदी लेखापाल अमृता जोशी, सनदी लेखापाल रोहन पाठक, सनदी लेखापाल गिरीश तारवानी, सनदी लेखापाल ईश्वर रोहरा, सनदी लेखापाल जीनल सावला प्रयत्न करत आहेत.