लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : टेस्ट ड्राई‌व्ह करून येतो असे सांगत दुचाकीच चोरी केल्याचा प्रकार भिवंडीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोमवारी निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-डोंबिवलीत गरीबाचा पाडा येथे सिमेंट काँक्रीट रस्ता रूंदीकरणातील व्यापारी गाळे जमीनदोस्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निजामपूरा भागात फसवणूक झालेल्या व्यक्तीचे दुचाकी विक्रीचे शो-रुम आहे. उस्मानाबादमध्ये राहणारा व्यक्ती त्यांच्या परिचयाचा असून सुमारे आठवडाभरापूर्वी तो मित्रासोबत शो-रुमध्ये दुचाकी खरेदीसाठी आला होता. त्यांना ६० हजार रुपये किमतीची एक दुचाकी पसंत पडली. त्यामुळे टेस्ट ड्राईव्ह करून येतो असे दोघांनी शो-रुम मालकाला सांगितले. मालकाने परवानगी दिल्यानंतर दोघेही दुचाकी घेऊन निघून गेले. परंतु ते परतलेच नाही. आठवडा उलटूनही दोघेही परतले नसल्याने त्यांनी दोघांविरोधात निजामपूरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.