काहींना वाटते मी म्हणजे ठाणे आहे. पण, नाही… ठाणे आणि शिवसेना यांचं नात आहे… ते पण खरी शिवसेना… खरी शिवसेना यामुळे म्हटलं की बाजारात आता चायनीज मालही येत आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे हिंदी भाषी मेळावा पार पडला. तेव्हा उद्धव ठाकरे बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, “गडकरी रंगायतन बाळासाहेब ठाकरे यांची देण आहे. निवडणुकीवेळी एका सभेत बाळासाहेब ठाकरेंना ठाण्यात नाट्यगृह नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं की, ‘तुम्ही शिवसेना सत्ता द्या, मी तुम्हाला नाट्यगृह देतो.’ त्यानंतर ठाण्यात नाट्यगृह झाले. नाट्यगृह आम्ही दिलं पण नाटक काही लोक करत आहे.”

हेही वाचा : VIDEO : “काहींना लवकरच ठाणे सोडून पळून जावे लागणार आहे”, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

“काहींना वाटते मी म्हणजे ठाणे आहे. पण, नाही… ठाणे आणि शिवसेना यांचं नात आहे… ते पण खरी शिवसेना… खरी शिवसेना यामुळे म्हटलं की बाजारात आता चायनीज मालही येत आहे. असेच काही चायनीज, बनावट, बोगस आणि गद्दार स्वत:ला शिवसेनेपेक्षाही मोठे समजतात. मात्र, ते एवढ्या वर जाऊ शकत नाही,” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

हेही वाचा : “…तर हा देश नालायक लोकांच्या हातात जाईल”, उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“एकमेकांमध्ये भेदभाव करतात, त्याला हिंदुत्व म्हटलं जात नाही. याला चाणक्य नीतीही म्हटलं जाऊ शकत नाही. पण, कुटनिती बोललं जाऊ शकते. ज्या स्वत:च्या स्वार्थासाठी काही लोक वापर करत आहेत,” असं टीकास्र उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडलं आहे.