लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : वाहतुक कोंडीमुळे ठाणेकर हैराण झाले असताना, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अवजड वाहनांची अवेळी वाहतुक पुन्हा एकदा सुरू झाली आहे. घोडबंदर मार्गावर अवजड वाहन चालक भरधाव वेगाने वाहन चालवित असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर केव्हा वचक बसणार असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

dcp dr shrikant paropkari transfer over riots in bhiwandi during ganpati visharjan
भिवंडी येथील राड्यानंतर आयपीएस अधिकाऱ्याची बदली
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
TC Ashish Pande Suspended
Ashish Pande : “मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही”, म्हणणाऱ्या टीसी आशिष पांडेचं रेल्वेने केलं निलंबन
fact check of viral video AIMIM rally in Mumbai
‘मुंबईकरांनो सावधान’ म्हणत शेअर होतोयं VIDEO ; नाशिक महामार्गावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा; वाचा घटनेची खरी गोष्ट
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरे येतात. या क्षेत्रातून मुंबई नाशिक महामार्ग, घोडबंदर, पूर्व द्रुतगती महामार्ग यासांरखे महत्त्वाचे मार्ग जातात. भिवंडी शहरात गोदामांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे उरण येथील जेएनपीटी बंदर, गुजरात येथून भिवंडी आणि नाशिक भागात होणाऱ्या अवजड वाहनांची वाहतुक ठाणे, भिवंडी शहरातून होत असते. अवजड वाहने घोडबंदर मार्गे शहरात थेट प्रवेश करतात. त्यामुळेअवजड वाहतुकीच्या समस्येमुळे ठाणेकर हैराण झाले आहेत. मागील काही महिन्यांपासून ठाणे शहरात अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे.

आणखी वाचा-धनगरांना आरक्षण दिले तर ८५ मतदार संघात भूमिका घेऊ, आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचा राज्य सरकारला इशारा

ठाणे आयुक्तालय क्षेत्रात अवजड वाहनांना दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे पाच या कालावधीत परवानगी असते. या वेळे व्यतिरिक्त इतर वेळांमध्ये अवजड वाहनांना प्रवेशबंदी असते. असे असतानाही ठाणे शहरात या नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आले आहे. शहरात सकाळच्या वेळेत नोकरदारांची वाहने बाहेर पडतात. त्याचवेळी अनेकदा अवजड वाहने बिनदिक्कत प्रवेश करू लागली आहेत. याचा परिणाम घोडबंदर तसेच इतर महत्त्वाच्या मार्गांवर होण्यास सुरूवात झाली आहे. काही अवजड वाहन चालक हे भरधाव वाहन चालवितात. त्यामुळे इतर हलक्या वाहन चालकांना अवजड वाहनांच्या धोकादायक वाहतुकीचा फटका सहन कारावा लागत आहे. बुधवारी देखील शहरात अवजड वाहनांची अवेळी वाहतुक दिसून आली. या वाहनांमुळे घोडबंदर, मुंबई महामार्गावर वाहनांचा भार वाढून वाहतुक कोंडी झाल्याचे चित्र होते. शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर कोंडी झाल्याचे चित्र होते.

अवजड वाहने रोखण्यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी योग्य कारवाई करणे आवश्यक आहे. अवजड वाहनांच्या वाहतुकीच्या अधिसूचनेचे पालन झाल्यास अपघात तसेच कोंडी रोखण्यास मदत होईल. -सुरेश देसले, प्रवासी.

यासंदर्भात वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांना संपर्क साधला. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.