ठाणे – ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वर्षा मॅरेथॉन या स्पर्धेत पुरुष गटात पुण्याचे एएसआयच्या धर्मेंद्र याने ०१ तास ०७ मिनिटे आणि ४१ सेकंद वेळेसह २१ किमीचे अंतर पार करत अव्वल स्थान पटकावले. तर, महिला गटात नाशिकच्या रविना गायकवाड यांनी ०१ तास २५ मिनिटे आणि ४६ सेकंद वेळ घेत शर्यत पूर्ण केली.
ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानेही राज्य पातळीवर मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येते. परंतू, ठाणे वर्षा मॅरेथॉनला करोनापासून गेली पाच वर्षे खंड पडला होता. या स्पर्धेत मुंबई ठाण्यातीलच नव्हे तर, महाराष्ट्रातून अनेक स्पर्धक सहभागी होत असतात. त्याचप्रमाणे आर्मीमधील नामवंत खेळाडू सहभागी होत असतात. देश आणि जागतिक पातळीवर धावपट्टू निर्माण करणे या उद्देशातून ही स्पर्धा घेण्यात येते. पाच वर्षाच्या खंडानंतर यंदा रविवारी या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनचे यंदा ३१ वे वर्षे होते.
या स्पर्धेत सुमारे २५ हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरुष गटाच्या तर, लता शिंदे यांनी महिला गटाच्या स्पर्धेला झेंडा दाखवला. त्यानंतर, टप्प्याटप्याने एकूण १२ गटातील स्पर्धांचा शुभारंभ महापालिका मुख्यालयासमोरील चौकातून करण्यात आला. सहभागी धावपटूंचा उत्साह पाहून मॅरेथॉनला झेंडा दाखवल्यानंतर स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मॅरेथॉनमध्ये धावण्याचा आनंद घेतला. त्यांनी धावपटूंसमवेत काही अंतर धावून त्यांचा उत्साह वाढवला.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी उपमहापौर पल्लवी कदम, महापालिका आयुक्त सौरभ राव, माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, परिवहन सेवेचे माजी सभापती विलास जोशी, माजी नगरसेवक पवन कदम, विकास रेपाळे, नम्रता भोसले, राजेश मोरे, सिद्धार्थ ओवळेकर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, परिवहन व्यवस्थापन भालचंद्र बेहरे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, सचिन सांगळे, दिनेश तायडे, शंकर पाटोळे, मिताली संचेती, क्रीडा उपायुक्त मीनल पालांडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील उपस्थित होते. ही मॅरेथॉन स्पर्धा विविध १२ गटात पार पडली. विजेत्यांना एकूण १० लाख ३८ हजार ९०० रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली. या २१ किमी पुरुष खुला गटात पुण्यातील धर्मेंद्र आणि महिला गटात नाशिकच्या रविना गायकवाड यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या विजेत्यास एक लाखांचे रोख पारितोषिक, सन्माचिन्ह, मेडल आणि प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींसाठी ‘कॉर्पोरेट रन’
महापालिका अधिकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यासाठी १ किमी ची‘कॉर्पोरेट रन’ ठेवण्यात आली होती. या स्पर्धेत महापालिका अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांनी सहभाग घेतला होता. त्याचप्रमाणे, ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेत महिला आणि पुरुष गटात ज्येष्ठ नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते. तर, दिव्यांगांच्या त्रिदल समुहानेही या मॅरेथॉनमध्ये विशेष सहभाग घेतला.
मॅरेथॉन स्पर्धेचा निकाल
पुरुष खुला गट – अंतर २१ किमी
१. धर्मेंद्र, एसएसआय, पुणे
२. अंकुश हक्के, सांगली
३. कमलाकर देशमुख, नाशिक
४. बेलिअप्पा एपी, एसएसआय, पुणे
५. सचिन यादव, मुंबई उपनगर
६. राज तिवारी, मुंबई
७. इश्वर झिरवाल, नाशिक
८. धुलदेव घागरे, सांगली
९. अमोल अमुने, सोलापूर
१०. सिद्धेश बर्जे, रत्नागिरी
महिला खुला गट – अंतर २१ किमी
१. रविना गायकवाड, नाशिक
२. आरती पवार, नाशिक
३. साक्षी जड्याल, रत्नागिरी
४. ऐश्वर्या खलाडकर, पुणे
५. रुक्मिणी भोरे, पालघर
६. अभिलाषा मोडेकर, पुणे
७. प्रियांका पैकाराव, ठाणे
८. प्रतिक्षा चोरमले, मुंबई
९. आंचल मारवा, मुंबई
१०. उर्मिला बने, मुंबई
पुरुष, १८ वर्षावरील, १० किमी
१. चैतन्य रुपनेर, सांगली
२. अतुल बरडे, नाशिक
३. वैभव शिंदे, नाशिक
४. आशुतोष यादव, मुंबई
५. प्रतिक डांगरे, पालघर
६. मन्नू सिंग, ठाणे
७. हितेश शिंदे, मुंबई
८. हर्षा चौहान, मुंबई
९. दत्ता आढाव, परभणी
१०. सूरज झोरे, सातारा
महिला, १६ वर्षावरील, १० किमी
१. साक्षी भंडारी, अहिल्यानगर
२. मानसी यादव, पुणे
३. रिनकी पवार, नाशिक
४. शेवंता पवार, धुळे</p>
५. आरती भगत, नागपूर
६. मोनिका सिंग, मुंबई
७. प्रियांका कुपते
८. आदिती पाटील, ठाणे
९. प्रियांका देवरे, नाशिक
१०. जयश्री कुंजरा, पालघर
मुले, १८ वर्षाखालील, १० किमी
१. रोहित संगा
२. विवेक शाह
३. ओंकार सावंत
४. आदित्य यादव
५. कृष्णा जाधव
६. आशिष गौतम
७. अनुप प्रजापती
८. विघ्नेश पाटील
९. दुर्वेश पाटील
१०. निशू शर्मा
मुले, १५ वर्षाखालील, ०५ किमी
१. आशिष राजबर
२. रुद्र घाडगे
३. कयान चव्हाण
४. ओंकार भट
५. सर्वेश लावंड
६. आयान पिंजारी
७. आर्यन वेखंडे
८. हर्षवर्धन सुर्वे
९. रोहीत राठोड
१०. प्रतिक खानसोळे
मुली, १५ वर्षाखालील, ०५ किमी
१. अल्येस लोपेझ
२. अल्विना मॅट्स
३. श्रेया ओझा
४. जस्लीन शैजू
५. भक्ती कदम
६. बुर्शा शेख
७. मानसी कांबळे
८. नेहा हलगरे
९. वंशिका जंगम
१०. प्रिती शहा
मुले, १२ वर्षाखालील, ०३ किमी
१. आराध्य पाटील
२. रिधम साईल
३. पवन वर्मा
४. तेजप्रताप कुमार
५. जेकब मेयन
६. दक्ष दळवी
७. सार्थक यादव
८. अयन पांडे
९. मारुती वर्मा
१०. अर्णव अडसुळ
मुली, १२ वर्षाखालील, ०३ किमी
१. ओवी पाटील
२. जान्हवी गुंजाळ
३. अभिगेल गॅरजल
४. आहाना निरंकारी
५. रिया गोसावी
६. तन्मयी भोईर
७. स्तुती फातर्फेकर
८. अद्विका घोळे
९. अनन्या प्रसाद
१०. अनघा भोईर
पुरुष – ६० वर्षांवरील, ०१ किमी
१. नारायण कंदमवार
२. सुधाकर शिंदे
३. एकनाथ पाटील
४. अशोक भोगले
५. पुनाजी सातव
महिला – ६० वर्षांवरील, ०१ किमी
१. आशा पाटील
२. रेखा ताम्हाणेकर
३. प्राची वाघ
४. शुभांगी भोगले
५. साधना दलाल