ठाण्यात महिलेची हत्या

वागळे इस्टेट येथील किसननगर भागात किरकोळ वादातून सुनीता कांबळे (३४) या महिलेची हत्या करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला.

man stabbed girlfriend s first lover
प्रतिनिधिक छायाचित्र : लोकसत्ता

ठाणे : वागळे इस्टेट येथील किसननगर भागात किरकोळ वादातून सुनीता कांबळे (३४) या महिलेची हत्या करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी महेश ठाकूर (३५) याला अटक केली आहे.

किसननगर क्रमांक दोन येथील इंदिरानगर चाळ परिसरात सुनीता कांबळे ही राहत होती. काही वर्षांपूर्वी ती तिच्या पतीपासून विभक्त झाली. त्यानंतर सुनीता यांची महेश ठाकूर यांच्यासोबत ओळख झाल्याने त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. रविवारी रात्री महेश आणि सुनीता यांच्यामध्ये वाद झाला. या वादातून महेशने सुनीता यांच्यावर कोयत्याने वार केले. यात सुनीता यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी महेश ठाकूरला अटक केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 17:43 IST
Next Story
ठाणे : वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नीच्या कंपनीत चोरी
Exit mobile version