ठाणे : कल्याण-शीळ मार्गावरील काटई येथे फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी सायंकाळी पुर्ण करत एमआयडीसीने चोवीस तासानंतर जिल्ह्यातील शहरांचा पाणी पुरवठा सुरु केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांना पाणी पुरवठा करणारी १७१२ मि.मी. व्यासाची ‘एमआयडीसी’ची जलवाहिनी कल्याण-शीळ मार्गावरील काटईजवळ शुक्रवारी सायंकाळी फुटली.

यामुळे ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथमधील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. ठाणे शहरातील वागळे इस्टेटचा काही भाग, कळवा, मुंब्रा, दिवा तर, कल्याण-डोंबिवलीमधील एमआयडीसी, २७ गावे आणि शहाड भागाचा पाणीपुरवठा बंद होता.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply to cities in thane district is smooth akp
First published on: 30-05-2021 at 01:53 IST